pune , market yard, crime news saam tv
मुंबई/पुणे

Crime News : मार्केट यार्डात गाेळीबार; २८ लाखांची लूट, पाेलिस तपास सुरु

पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

Pune Firing News : पुणे शहरातील मार्केट यार्ड परिसरात आज (शनिवार) दुपारच्या सुमारास गाेळीबार करुन चाेरट्यांनी अठ्ठावीस लाख रुपये लुटले. ही घटना अंगडियाचा व्यवसाय करणा-या एकाच्या कार्यालयात घडली आहे. या घटनेची माहिती समजताच पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Pune Latest Marathi News)

पुण्यातील (pune) मार्केट यार्ड परिसरातील एका इमारतीत अंगडिया व्यावसायिकाचे कार्यालय आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास चेह-यावर स्कार्फ बांधून आलेल्यांनी कार्यालयात शिरकाव केला. त्यानंतर चोरट्यांनी अंगडिया कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बंदूकीचा धाक दाखवित पैशांची मागणी केली. (Maharashtra News)

त्याचवेळी चोरट्यांनी गोळीबार केल्याची माहिती स्थानिकांनी सांगितली. या कार्यालयातून चाेरट्यांनी २८ लाख रुपये चाेरले. दरम्यान या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर पोलिसांच्या (police) पथकाने पळून गेलेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी तातडीने नाकाबंदी केली. पाेलिस सध्या संशयित वाहनांची तपासणी करीत आहेत. याबराेबरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाच्या माध्यमातून तपास सुरु करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर विमानतळावर महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानाची नागरिकांना मारहाण

Weather : आंध्रच्या किनाऱ्याला धडकणार चक्रीवादळ, महाराष्ट्रातील 'या' भागात धो-धो पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा नवा इशारा

Monday Horoscope : नवीन जबाबदाऱ्या मिळतील! ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

SCROLL FOR NEXT