Police Bharti Saam Tv
मुंबई/पुणे

Police Bharti: पोलीस भरतीवेळी धावताना चक्कर येऊन जमिनीवर कोसळला, २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune News: पुण्यात पोलीस भरतीसाठी शिवाजीनगर पोलीस ग्राऊंडवर मैदानी चाचणी सुरू आहे. यातच मैदानी चाचणीदरम्यान, एका तरुणाचा मृत्यू झाला झाल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

राज्यात सुमारे १७,००० हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यातच पोलीस भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणीत उमेदवारांच्या शारीरिक क्षमतेची कसोटी लागत असते. याशीच संबंधित पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. येथे मैदानी चाचणीदरम्यान, एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ⁠तुषार बबन भालके (वय २७), असं मृत तरुणाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात पोलीस भरतीसाठी शिवाजीनगर पोलीस ग्राऊंडवर मैदानी चाचणी सुरू आहे. याचसाठी तुषार बबन भालके हा तरुणही येथे आला होता.

यावेळी मैदानी चाचणीदरम्यान धावताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, नवी मुंबईतील पोलीस भरतीदरम्यानही एका तरुणाचा मृत्यू झाला होता. नवी मुंबईतील एसआरपीएफ कॅम्पमध्ये पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी सुरू होती. त्यावेळी ही घटना घडली. प्रेम ठाकरे, असे २९ वर्षीय मृताचे नाव असून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याआधी २९ जून रोजी ठाण्यातील राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरतीसाठी झालेल्या शारीरिक चाचणीदरम्यान २५ वर्षीय उमेदवाराचा मृत्यू झाला होता. तर इतर पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत अक्षय बिराडे यांच्यासह इतर पाच उमेदवारांना चक्कर आणि उलट्या झाल्यामुळे त्यांना कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donut Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा एगलेस टेस्टी चॉकलेट डोनट्स; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: संध्याकाळी ५ वाजेपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला जमीन मंजूर

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, पुणे- नाशिकसह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Late Night Cravings: रात्री अचानक तुम्हालाही लागते का भूक? या गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं

SCROLL FOR NEXT