Maharashtra Local Body Election: मुंबई महापालिकेची निवडणूक केव्हा होणार? सुप्रीम कोर्टात १२ जुलैला होणार फैसला

BMC Election OBC Reservation Hearing In Supreme Court: मुंबई महापालिकेची निवडणूक केव्हा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सुप्रीम कोर्टात १२ जुलैला फैसला होण्याची शक्यता आहे.
 महापालिकेच्या निवडणुका
Maharashtra Local Body ElectionSaam Tv

प्रमोद जगताप, समा टीव्ही नवी दिल्ली

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टात १२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. या निवडणुका केव्हा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सुप्रीम कोर्टात आता १२ तारखेला निर्णय होण्याची शक्यता (Maharashtra Local Body Election) आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यामुळे सुप्रीम कोर्टाने निवडणुकीला स्थगिती दिली होती. मागच्या जवळपास १ वर्षांपासून या प्रकरणी सुनावणी झालेली नाही. कोर्टाने राज्य सरकारला या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना मागच्या सुनावणीवेळी दिल्या होत्या. आता तरी कोर्टात ही सुनावणी होऊन या निवडणुकांचा मार्ग मोकळा होतो का? हे पाहणं महत्वाचं ठरणार (BMC Election) आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणामध्ये 'तारीख पे तारीख' असं चित्र आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आता १२ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात १६ एप्रिल रोजी सुनावणी होणार होती. परंतु हीच सुनावणी आता १२ जुलैला होणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत २८ नोव्हेंबर २०२३ आणि ९ जानेवारी २०२४, ४ मार्च आणि १६ एप्रिल २०२४ या तारखा सुनावणीसाठी देण्यात आल्या होत्या. परंतु यावेळी सुनावणीच झाली (OBC Reservation) नाही.

 महापालिकेच्या निवडणुका
Local Bodies Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली? निवडणूक आयोगाने दिल्या महत्वाच्या सूचना

या प्रकरणात मागील दीड वर्षामध्ये एकदा देखील सुनावणी झालेली नाही. मुंबई आणि पुण्यासह राज्यातील अनेक महानगरपालिका, जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीवर अवलंबून (Mumbai Municipal Corporation Elections) आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी १ ऑगस्ट २०२३ ला झाली होती.

 महापालिकेच्या निवडणुका
Maharashtra Local Bodies Election: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, 'या' तारखेला होणार सुनावणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com