Pune Crime: लग्नाचे आमिष दाखवून 27 वर्षीय तरुणीवर बलात्कार  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: लग्नाचे आमिष दाखवून 27 वर्षीय तरुणीवर बलात्कार

पुण्यात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: पुण्यात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका व्यक्तीने आपला घटस्फोट झाल्याचे सांगून एका २७ वर्षीय तरुणीवर वारंवार बलात्कार केला आहे. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला आहे. धक्कादायक विषय म्हणजे आरोपीच्या या काळ्या कृत्यामध्ये त्याच्या पत्नीचा देखील सहभाग आहे. आरोपी पीडितेवर जबरदस्तीने बलात्कार करत असताना, तिने दोघांचे अश्लील फोटो क्लिक केले आहेत. (27 year old girl sexual assualt for marriage)

विकृत जोडपे केवळ एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पीडित तरुणीचे न्यूड फोटो तिच्या पतीला पाठवून तिची बदनामी केली आहे. या प्रकरणी २७ वर्षीय पीडितेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कार बरोबरच विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल गायकवाड (वय-४७) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो कोंढवा परिसरामधील पॅराडाईज व्हिला येथील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हे देखील पहा-

पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल आणि पीडित तरुणीची सर्वप्रथम २०१८ साली ओळख झाली होती. पीडित तरुणीच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगत आरोपीने पीडितेशी जवळीक साधली होती. तसेच आपला घटस्फोट झाला असल्याचे खोटे सांगून पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले होते. तसेच माझी पत्नी केवळ पैशाकरिता माझ्याबरोबर राहत आहे, अशी खोटी माहिती आरोपीने पीडितेला दिली होती. यानंतर आरोपीने २०१८ पासून २ फेब्रुवारी २०२२ पर्यंत टर्फ क्लब हाऊस, कॅम्प आणि पाषाण येथील आपल्या घरी पीडितेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आहेत.

दरम्यान आरोपीच्या पत्नीने दोघांचे अश्लील फोटो आपल्या मोबाइलमध्ये क्लिक केले आहेत. तू माझ्याबरोबर राहिली नाहीस तर 'तुला जीवे मारून टाकेन' अशी धमकी देखील आरोपीने पीडितेला दिली होती. नराधम जोडपे एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पीडित तरुणीच्या लग्नानंतर तिच्या पतीला दोघांचे अश्लील फोटो पाठवून बदनामी केली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banjara Reservation: बंजारा समाजासाठी OBC नेते मैदानात, सरकारला शह देण्यासाठी OBC नेत्यांची खेळी?

ATM Slip Fraud Alert: ATM ची स्लीप फेकणं महागात पडणार? स्लीप फेकल्याने KYC हॅक होणार?

Boat Capsized: धक्कादायक! प्रवाशांनी भरलेली बोट नदीत बुडाली, ८६ जणांचा मृत्यू

Chhagan Bhujbal: सरकारनं दबावाखाली जीआर काढला, छगन भुजबळ थेटच बोलले|VIDEO

Plane Emergency Landing : महिला पायलटच्या धाडसाने विमानाचा मोठा अपघात टळला; धैर्याने ७५ प्रवाशांचे प्राण वाचवले

SCROLL FOR NEXT