Lata Mangeshkar And Cricket love: लता मंगेशकर अन् ८३ चा विश्वचषक; काय घडला होता प्रसंग, जाणून घ्या

लता मंगेशकर यांना गाण्याबरोबरच क्रिकेटमध्ये देखील खूप रस होता. सुरांच्या मल्लिका समजले जाणाऱ्या लता दिदी मोकळ्या वेळेत एकतर रियाज करत असल्याचे नाहीतर क्रिकेटचे सामने बघायचे.
Lata Mangeshkar And Cricket love: लता मंगेशकर अन् ८३ चा विश्वचषक; काय घडला होता प्रसंग, जाणून घ्या
Lata Mangeshkar And Cricket love: लता मंगेशकर अन् ८३ चा विश्वचषक; काय घडला होता प्रसंग, जाणून घ्याSaam Tv
Published On

मुंबई : लता मंगेशकर यांना गाण्याबरोबरच क्रिकेटमध्ये देखील खूप रस होता. सुरांच्या मल्लिका समजले जाणाऱ्या लता दिदी मोकळ्या वेळेत एकतर रियाज करत असल्याचे नाहीतर क्रिकेटचे सामने बघायचे. १९८३ मध्ये लॉर्ड्स येथे झालेल्या शानदार विश्वचषकाच्या विजयाच्या लतादिदी हे साक्षीदार आहेत. यावरून त्यांना क्रिकेटविषयी किती रूची आणि प्रेम आहे समजले होते. एवढेच नाही तर भारतीय संघाकरिता पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी एक खास योजना केली होती. (Lata Mangeshkar 83 World Cup Cricket love)

ज्यामध्ये क्रिकेटपटूंनी देखील त्याच्यांबरोबर गाणी गायली होती. अलीकडे रणवीर सिंग स्टार '८३' चित्रपटामध्ये, १९८३ च्या लॉर्ड्स मैदानावर गौरवशाली क्षण पडद्यावर दाखवण्यात आले होते. या चित्रपटाने लोकांना परत एकदा भारतीय क्रिकेटच्या सोनेरी दिवसांच्या आठवणी मिळाले होते. परंतु, भारताच्या प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी स्वतः प्रेक्षक गॅलरीमध्ये टाळ्या वाजवताना ते क्षण जगले हे क्वचितच कुणाला ठाऊक असणार आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये लतादीदींनी सांगितले होते की, "तिथे तणावपूर्ण वातावरण होते, पण जसजशी सामन्याची अंतिम फेरी येऊ लागली होती, तसतसा मला भारताच्या विजयावर पूर्ण विश्वास होता.

हे देखील पहा-

मात्र, क्रिकेटमध्ये सामन्याला कधी वळण लागणार हे सांगता येत नाही. लता मंगेशकर म्हणाले होते की, सामन्याअगोदर संपूर्ण क्रिकेट संघ मला भेटला होता. प्रत्येक क्रिकेटर आम्हीच सामना जिंकू असे म्हणत होता. मला आठवतंय की मी त्यांना विचारले होते की तुम्हाला काय वाटते. तेव्हा संघ जिंकणारच, असे खेळाडूंनी पूर्ण आत्मविश्वासाने सांगितले होते आणि जिंकून इतिहास रचवला आहे, ही खूप मोठी गोष्ट होती. लतादिदींनी पुढे सांगितले की जेव्हा संघ सामना जिंकला तेव्हा क्रिकेट बोर्डाकडे पैसे नव्हते, म्हणून एक खास योजना त्यानी आखली होती. (Lata Mangeshkar 83 World Cup Cricket love)

Lata Mangeshkar And Cricket love: लता मंगेशकर अन् ८३ चा विश्वचषक; काय घडला होता प्रसंग, जाणून घ्या
Lata Mangeshkar: 20 भाषांमध्ये 30 हजारांहून जास्त गाणी; कधी नाचवलं, कधी रडवलं

लता मंगेशकर यांनी सांगितले होते की, १९८३ मध्ये त्या लंडनला सुट्टीसाठी गेले होते. लंडनमध्ये त्यांनी एनकेपी साळवे साहेबांना भेटले होते. जेव्हा भारतीय संघ जिंकला तेव्हा त्यांनी सांगितले की या शानदार विजयावर त्यांना एक मोठा कार्यक्रम करायचा आहे. तू तो कार्यक्रम करशील का? ते नक्कीच करेन असे सांगितले होते. १७ ऑगस्टला दिल्लीला येऊन पोहोचले आणि तेथे एक खास कार्यक्रम करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये नितीन मुकेश आणि मुकेश भैय्या यांचा मुलगा सुरेश वाडेकर यांनी देखील त्यांना चांगली साथ दिली होती.

या शोमध्ये राजीव गांधी देखील उपस्थित होते. लतादिदींनी सांगितले होते की, खूप मोठा आणि चांगला कार्यक्रम झाला होता. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे भावाने संगीतबद्ध केलेले गाणे सर्व क्रिकेटपटूंनी मिळून गायले होते. या गाण्याने ती मैफल संपली आणि गमतीची गोष्ट म्हणजे क्रिकेटच्या मैदानात बॅट आणि बॉलचा करिष्मा दाखवणारे अनेक क्रिकेटपटू खूप छान गात होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com