Chartered Accountant Died Due To Work Stress Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात नोकरी, ४ महिन्यांतच मृत्यू; २६ वर्षीय CA तरुणीचा 'वर्क प्रेशर'मुळं मृत्यू झाल्याचा आईचा आरोप

Chartered Accountant Died Due To Work Stress: कामाच्या अतिताणामुळे पुण्यामध्ये चार्टर्ड अकाऊंटंटचा मृत्यू झाला. या तरुणीच्या आईने कंपनीच्या प्रमुखाला लिहिलेल्या पत्रामुळे हे प्रकरण चर्चेत आले.

Priya More

कामाच्या अति ताणामुळे पुण्यामध्ये राहणाऱ्या चार्टर्ड अकाऊंटंट तरुणीचा मृत्यू झाला. एना सेबॅस्टियन पेरियाल असं या तरुणीचे नाव होते. 'अर्न्स्ट अँड यंग' या कंपनीमध्ये ती कार्यरत होती. या कंपनीमध्ये रुजू झाल्यानंतर अवघ्या ४ महिन्यातच या तरुणीचा मृत्यू झाला. एना सेबॅस्टियन पेरियालचा मृ्त्यू जुलै महिन्यात झाला होता. पण आता एना सेबॅस्टियनची आई अनिता ऑगस्टियनने कंपनीवर गंभीर आरोप केल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. कामाच्या दबावामुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी या कपंनीचे भारतातील प्रमुख राजीव मेमाणी यांना थेट पत्र लिहून मुलीच्या मृत्यूमागची कारणं सांगितली आहेत.

अर्न्स्ट अँड यंग या कंपनीचे भारतातील प्रमुख राजीव यांना लिहिलेल्या पत्रामध्ये एना सेबॅस्टियन पेरियालच्या आईने आरोप केला आहे की, 'माझ्या मुलीला कामाचा प्रचंड ताण होता. तिला खूप जास्त काम करण्यास सांगितले जात होते. ती अनेकदा रात्र-रात्र अनेक तास काम करत होती. तिला झोप मिळत नव्हती. त्याचसोबत तिला आरोग्याविषयी अनेक समस्या होत्या.'

त्यांनी या पत्रामध्ये पुढे असे सांगितले की, '६ जुलै रोजी पुण्यात सीए दीक्षांत समारंभामध्ये माझी मुलगी सहभागी होण्यासाठी पतीसोबत गेली होती. त्याठिकाणी अचानक तिच्या छातीमध्ये दुखू लागले. त्यानंतर तिला लगेच डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी कमी झोप आणि कमी जेवणामुळे तिला त्रास झाल्याचे सांगितले होते. २० जुलैला माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी मला मिळाली. माझी मुलगी फक्त २६ वर्षांची होती. माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर कंपनीचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी तिच्या अंत्यविधीला उपस्थित नव्हता.'

तसंच, एना योद्धा होती असे म्हणत तिच्या आईने पत्रात पुढे असे लिहिले की, 'कामाचा ताण, नवीन वातावरण आणि कामाचे जास्त तास यामुळे तिच्यावर शारीरिक, भावनिक आणि मानसिक परिणाम झाला. जॉइन झाल्यानंतर लगेचच तिला चिंता, निद्रानाश आणि तणावाचा अनुभव येऊ लागला. परंतु कठोर परिश्रम आणि चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली आहे यावर विश्वास ठेवून ती स्वतःला पुढे ढकलत राहिली.'

दरम्यान, एना सेबॅस्टियन पेरियाल केरळच्या कोची येथील रहिवासी होती. नोव्हेंबर २०२३ मध्ये ती सीएची परीक्षा पास झाली. मार्च २०२४ मझ्ये तिला ENY या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. एना सेबॅस्टियन पेरियालने सेक्रेड हार्ट कॉलेज थेवरा येथून बॅचलर ऑफ कॉमर्स इन फायनान्स अँड टॅक्सेशनचा अभ्यास केला. बीकॉम पूर्ण केल्यानंतर तिने सीएची तयारी सुरू केली आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये एनाने सीएची परीक्षा उत्तीर्ण केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT