Pune News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यामध्ये तोडफोडीचं सत्र सुरु; मध्यरात्री टोळीने दहशत माजवली, २१ वाहनांच्या काचा फोडल्या; पाहा CCTV व्हिडिओ

Pune News : पुण्यातील धनकवडी परिसरात रात्रीच्या वेळी तीन अज्ञात हल्लेखोरांनी एकूण २१ गाड्यांच्या काचा फोडून तोडफोड केली. वारंवार अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांवर टीका.

Alisha Khedekar
  1. धनकवडी परिसरात रात्रीच्या वेळी तीन अज्ञात हल्लेखोरांनी गाड्यांची तोडफोड केली.

  2. एकूण २१ वाहनांचे काचे फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

  3. दोन नागरिकांना मारहाण; पोलीस तपास सुरू असून हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद.

  4. नागरिकांमध्ये संताप; शहरात वाढत्या गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी.

पुण्यात गेले काही दिवसांपासून भवानी पेठ, रामटेकडी आणि कोंढवा या घटना ताजा असताना धनकवडी भागात रात्री हल्लेखोरांनी धुडगूस घातली. तीन अज्ञात हल्लेखोरांनी तब्ब्ल २१ गाड्यांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे. अशा सतत घडणाऱ्या घटनेने नागरिक संतप्त झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस या हल्लेखोरांचा तपास करत आहेत.

सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या धनकवडी परिसरातील केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक, आणि नवनाथ नगर इथे काही गाड्या पार्किंगला लावल्या होत्या. रात्रीच्या सुमारास तीन अज्ञात हल्लेखोरांनी रस्त्यावर पार्किंगला लावलेल्या एकूण १५ ऑटो रिक्षा, ३ कार, २ शालेय बस, आणि १ पियाजिओ टेम्पो अशा एकूण २१ गाड्यांच्या काचा फोडून गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. त्याचवेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन नागरिकांना या हल्लेखोरांनी मारहाण करून जखमी केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना तत्काळ उपचारासाठी कामे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस या हल्लेखोरांचा तपास करत आहेत.

शहरात विविध भागांत टोळक्यांकडून वारंवार धुडगूस घालण्याच्या घटना समोर येत असतानाच काल रात्री घडलेल्या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. महिला सुरक्षित नाहीत तसेच पोलीस पेट्रोलिंग करत नाहीत असा आरोप स्थानिक नारिकांकडून करण्यात आला आहे.

अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होऊनही आरोपी मात्र मोकाट आहेत. एकीकडे पुणे पोलिस आयुक्त भयमुक्त पुणे करू,महिला सुरक्षित आहेत असा दावा करत असले तरी शहरातील नागरिकांच्या मनातील भीती मात्र जात नाही. त्यामुळे नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांत किती हल्ले झाले?

२८ जून : चतुः शृंगी पोलिसांच्या हद्दीत विधाते वस्ती येथे १५ जणांचा धुडगूस.

२८ जून : सिंहगड रस्त्यावर माणिकबाग येथे चौघांनी राडा घालून १५ वाहनांची तोडफोड केली.

३ जुलै : पूना कॉलेज येथे निकाल पाहण्यासाठी गर्दी झाल्यानंतर किरकोळ कारणावरून १० ते १५ जणांनी राडा घालून, एका तरुणाला धारदार हत्याराने मारहाण केली.

५ जुलै : वानवडीत मध्यरात्री दोन गट भिडले. दारूच्या बाटल्यांनी एकमेकांना मारहाण.

१२ जुलै : कात्रज-कोंढवा रस्त्यावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने दुचाकीवरून येऊन हातात कोयते आणि तलवारी घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. एका तरुणावर हल्लाही केला.

२० जुलै : भवानी पेठ आणि कोंढवा येथे टोळक्याचा राडा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT