Mumbai corona update SAAM TV
मुंबई/पुणे

सावधान! मुंबईत कोरोना वाढताच, नव्या रुग्णसंख्येमुळं चिंता वाढली

गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : येथे कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (Mumbai corona update) होणारी वाढ चौथ्या लाटेला आमंत्रण करणारी असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णसंख्येत (corona new patients) मोठी वाढ होत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे.

आजही मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत (corona) लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईतील नव्या कोरोना रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा पार केल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबईत आज दिवसभरात कोरोनाच्या नव्या २०८७ रुग्णांचं निदान झालं आहे. त्यामुळे मुंबईतील आजपर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा १०,९४,६४४ वर पोहोचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे नवे २०८७ रुग्ण सापडले आहेत. तर मुंबईत आज एका रुग्णाचा मृत्यू (corona death) झाल्याने कोराना मृतांची संख्या १९,५८३ वर पोहोचली आहे. तसेच आज कोरोनाचे नवे ९५ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, मुंबईत १३,८९७ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत आज १८०२ रुग्णांना डिस्चार्ज दिला असून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १,०१६,१६४ वर गेली आहे त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के एवढा झाला आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा दर ३८१ दिवसांवर पोहोचला आहे.

Edited By -Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धात अडकलेल्या गाझामध्ये वाळूचे वादळ; नागरिकांचे हाल, VIDEO

Pune Crime: वाघोलीनंतर आता सिंहगडमध्ये कोयता हल्ला; कोयत्यानं सपासप वार करत १९ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कंत्राटात मोठा भ्रष्टाचार? KDMC महापौरांकडून चौकशीचे आदेश

आता सरकारचा इंटरनेट टॅक्स? मोबाईल इंटरनेटही महागणार?

Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ३ आमदारांवर होणार कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT