Badlapur Brothers Death Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur Brothers Death: फार्म हाऊसवर विजेच्या धक्क्याने २ चुलत भावांचा मृत्यू, वाचवायला गेलेला तिसरा भाऊ थोडक्यात बचावला

Priya More

अजय दुधाणे, बदलापूर

Badlapur News: बदलापूरमध्ये (Badlapur) दोन चुलत भावांचा विजेचा धक्का लागल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बदलापूरच्या ग्रामीण भागातल्या वांगणीजवळील ढवळेगावात ही घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या दोन भावांचा वाचवण्यासाठी गेलेला तिसरा भाऊ थोडक्यात बचावला आहे. या घटनेमुळे ढवळे गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वांगणीजवळील ढवळे गावात बदलापूरमधील ममता हॉस्पिटलचे मालक राठोड यांचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसमध्ये विजेचा धक्का लागून दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जयेश बैकर (वय 19 वर्षे) आणि त्याचा चुलत भाऊ कुमार बैकर (वय 17 वर्षे) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहेत.

जयेश हा फॉर्म हाऊसमधील कोंबड्यांच्या खुराड्याचा दरवाजा उघडण्यासासाठी गेला होता. मात्र या दरवाजामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. जयेशला वाचवण्यासाठी त्याचा सख्खा चुलत भाऊ कुमार गेला. पण त्याला देखील विजेचा धक्का लागला. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दोघांना पाहण्यासाठी गेलेल्या त्यांच्या तिसऱ्या चुलत भावाला विजेचा सौम्य धक्का लागला. त्यामुळे तो थोडक्यात बचावला.

या घटनेत मृत्यू झालेल्या कुमार बैकरच्या वडिलांनी ढवळे गावात फार्म हाऊस चालवयाला घेतले आहे. ते या फार्म हाऊसच्या देखरेखीचे आणि साफसफाईचे काम करतात. या फार्म हाऊसमध्येच काम करत असताना कोंबड्यांच्या खुराड्याचा दरवाजात विद्युत प्रवाह उतरल्याने दोन भावांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे बैकर कुटुंबीयांवर आणि गावावर शोककळा पसरली आहे. तर आसपासच्या गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT