- सिद्धेश म्हात्रे
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर 15 (belapur sector 15) मधील एका पडीक इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून एका 19 वर्षीय युवतीचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. (Maharashtra News)
या घटनेबाबत पाेलिसांकडून मिळालेली माहिती अशी - नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर 15 मधील एका पडीक इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडलेली ही युवती आपल्या मित्राच्या घरी गेल्या दोन दिवसांपासून राहत होती. आज सकाळी मित्राने त्याच्या मित्राला घरी बोलावून पार्टी करण्याचा बेत आखला हाेता.
सर्व तयारी केली मात्र युवती आणि तिच्या मित्राने घरी नको म्हणून बाहेर जाऊन पार्टी करण्याचे ठरवले. घरी आई येईल म्हणून बेलापूर मधील एका पडीक इमारतीच्या सातव्या मजल्यावर जाऊन या दाेघांनी पार्टी रंगवली.
पार्टी ऐन रंगत असताना युवतीचा मित्र लघुसशंकेला उठून बाजूला गेला. युवती देखील त्याच्या मागून गेली आणि पाय घसरून इमारती खाली पडली. या दुर्घटनेत युवतीचा जागीच मृत्यू झाला असे पाेलिसांनी नमूद केले.
या घटनेचा एनआरआय पोलिस अधिकारी (NRI Police) तपास करत आहेत. प्राथमिक माहिती नुसार युवतीने मद्याचे सेवन केले असल्याने पाय घसरून पडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु केली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.