Black Tongue: जीभ काळी का पडते? तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण

Priya More

तोंडाची स्वच्छता

जीभ काळी पडण्याची समस्या अनेकांना भेडसावते. तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे हे यामागचे कारण आहे.

Black Tongue | Social Media

ब्लॅक हेअरी टंग

काळ्या जीभेला ब्लॅक हेअरी टंग असे म्हणतात. ही एक सौम्य स्थिती आहे. पुरूषांमध्ये आणि वृद्ध व्यक्तींमध्ये जीभ काळी होण्याची समस्या अधिक असते.

Black Tongue | Social Media

जीभ न घासणे

जीभ काळी होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे नीट दात आणि जीभ न घासणे. यामुळे जिभेवर मृत पेशी आणि जीवाणू जमा होऊन ती अधिक काळी दिसते.

Black Tongue | Social Media

धुम्रपान करणे

तंबाखू आणि धुम्रपान केल्यामुळे जीभ काळी होण्याची समस्या निर्माण होते. यामुळे जीभेवर मृत पेशींची वाढ होते.

Black Tongue | Social Media

चहा आणि कॉफीचे सेवन

चहा आणि कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे पोपिलावर रंगद्रव्ये चिकटून राहतात आणि जीभ काळी होते.

Black Tongue | Social Media

औषधं खाल्ल्याने

काही औषधं खाल्ल्यामुळे तोंडातील जिवाणूंचे संतुलन बिघडते आणि तुमची जीभ काळी पडते.

Black Tongue | Social Media

तोंड स्वच्छ ठेवणे

लाळ कमी झाल्यामुळे तोंड स्वच्छ होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे देखील जीभ काळी पडते.

Black Tongue | Social Media

मद्यपान करणे

मद्यपान करणाऱ्यांमध्ये जीभ काळी होण्याचे प्रमाणा जास्त आहे. कारण मद्यपानामुळे तोंड कोरडे पडते आणि जिभेवर रंग साचून राहतो आणि हळूहळू ती काळी होते.

Black Tongue | Social Media

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. साम टिव्ही याचं समर्थन करत नाही.

Black Tongue | Social Media

NEXT: सैंधव मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने काय होते?

Rock Salt Water Bath | Saam TV
येथे क्लिक करा...