Menopause Symptoms: महिलांच्या शरीरात वयाच्या ३० वर्षांनंतर होतात हे मोठे बदल; काय आहे कारण मेनोपॉज की दुसरं काही?

Shruti Vilas Kadam

वयाच्या ३० वर्षांनंतर हार्मोन्समध्ये बदल होतात का?

महिलांच्या शरीरात हार्मोन्समध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर बदल होत असतात. मात्र, वयाच्या ३० वर्षांनंतर होणारा प्रत्येक बदल हा मेनोपॉजचा असतो असे नाही. थकवा, झोपेच्या समस्या किंवा मूडमध्ये बदल देखील कारणीभूत ठरताता.

PERIODS | PINTEREST

मासिक पाळी अनियमित होणे

मेनोपॉजच्या आधीच्या काळात म्हणजेच पेरीमेनोपॉजमध्ये मासिक पाळी अनियमित होऊ शकते. पाळी लवकर किंवा उशिरा येणे, रक्तस्रावाचे प्रमाण बदलणे अशी लक्षणे दिसू शकतात.

Menopause age stage | Saam tv

अचानक गरम होणे आणि रात्री घाम येणे

शरीरात अचानक उष्णता जाणवणे, चेहरा किंवा मान गरम होणे आणि रात्री घाम येणे ही मेनोपॉजशी संबंधित सामान्य लक्षणे आहेत. मात्र, ही लक्षणे केवळ मेनोपॉजमुळेच होतात असे नाही.

What is menopause? | Saam Tv

झोप न लागणे आणि मूड बदलणे

मेनोपॉजच्या संक्रमण काळात काही महिलांना झोपेच्या समस्या, चिडचिड, चिंता किंवा मूडमध्ये बदल जाणवू शकतात. ही लक्षणे दैनंदिन जीवनावर परिणाम करत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

sleep problems | pinterest

वयाच्या ३० व्या वर्षी मेनोपॉज येऊ शकतो का?

बहुतेक महिलांमध्ये नैसर्गिक मेनोपॉज साधारणपणे वयाच्या ४५ ते ५५ वर्षांदरम्यान येतो. वयाच्या ४० वर्षांपूर्वी मेनोपॉज आल्यास त्याला अकाली मेनोपॉज म्हटले जाते. त्यामुळे तिशीत लक्षणे जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका.

Menopause Age | Yandex

मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी कायमची बंद होणे

सलग १२ महिने मासिक पाळी न आल्यास आणि त्यामागे अन्य वैद्यकीय कारण नसल्यास मेनोपॉज झाल्याचे मानले जाते.

Menopause | Yandex

मेनोपॉजची लक्षणे दिसल्यास काय करावे?

मासिक पाळीतील बदल, अचानक गरम होणे किंवा झोपेच्या समस्या असल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रत्येक लक्षणाचा संबंध मेनोपॉजशी जोडू नका.

Menopause Age | Yandex

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

PERIODS | PINTREST

Sleeping Position: कंबर आणि पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी कसे झोपावे? जाणून घ्या झोपण्याच्या ७ योग्य पोझिशन्स

Sleeping Position | Saam Tv
येथे क्लिक करा