Shruti Vilas Kadam
पाठदुखीचा त्रास असल्यास कुशीवर झोपून पाहा. शरीराला आरामदायी वाटणारी बाजू निवडा. झोपण्याची योग्य स्थिती तुमच्या आरामानुसार ठरते.
कुशीवर झोपताना गुडघ्यांच्या मध्ये एक उशी ठेवल्याने नितंब आणि पाठीच्या कण्यावरील ताण कमी होण्यास मदत होते.
पाठीवर झोपण्याची सवय असल्यास गुडघ्याखाली छोटी उशी ठेवा. यामुळे पाठीच्या खालच्या भागावरील ताण कमी होण्यास मदत होते.
पोटावर झोपल्यामुळे मान एका बाजूला वळवावी लागते. काही लोकांमध्ये या स्थितीमुळे मान आणि पाठीवर ताण येऊ शकतो. त्यामुळे शक्य असल्यास कुशीवर किंवा पाठीवर झोपा.
खूप मऊ किंवा खूप कठीण गादीमुळे झोप नीट लागत नाही. शरीराला योग्य आधार देणारी गादी आणि मानेला आधार देणारी उशी निवडा.
दिवसभर बसून काम केल्यामुळे पाठीच्या स्नायूंमध्ये ताण येतो. झोपण्यापूर्वी स्ट्रेचिंग केल्याने आराम मिळू शकतो. मात्र, अधीक त्रास होणारे व्यायाम करू नका.
दररोज ठरावीक वेळी झोपणे आणि पुरेशी झोप घेणे शरीरासाठी महत्त्वाचे आहे. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करा आणि झोपण्यासाठी शांत वातावरण ठेवा.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.