Water for Weight Loss: वजन कमी करायचे आहे? मग रोज किती पाणी प्यावे? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Shruti Vilas Kadam

दिवसाची सुरुवात पाण्याने करा

सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते. मात्र, सकाळी पाणी प्यायल्याने पचन सुरळीत होण्यास मदत होते.

drink water | pinterest

दिवसभर पुरेसे पाणी प्या

वजन कमी करण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. किती पाणी प्यावे हे तुमचे वय, वजन, शारीरिक हालचाली आणि हवामान यावर अवलंबून असते. तर साधारण ३ लिटर पाणी पिणे गरेचे असते.

drink water | pinterest

जेवणापूर्वी पाणी प्या

जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने काही लोकांना पोट भरल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे खाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

drink water | pinterest

सॉफ्ट ड्रिंक्स टाळा

सॉफ्ट ड्रिंक्स आणि साखर घातलेल्या पेड्रिंक्समध्ये जास्त कॅलरीज असू शकतात. त्याऐवजी साधे पाणी प्यायल्याने कॅलरीज जास्त वाढत नाहीत.

Soft Drinks Have Bubbles | Google

व्यायाम करताना पाणी प्या

व्यायाम करताना घामाद्वारे शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे व्यायामापूर्वी, व्यायामादरम्यान आणि नंतर गरजेनुसार पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

exercise | pinterest

दिवसभर थोडे-थोडे पाणी प्या

एकाच वेळी भरपूर पाणी पिण्याऐवजी दिवसभर नियमित अंतराने पाणी प्या. तहान, लघवीचा रंग आणि शारीरिक हालचाली लक्षात घेऊन पाण्याचे प्रमाण ठरवा.

Drink Water | pinterest

पाण्यासोबत संतुलित आहार घ्या

वजन कमी करण्यासाठी फक्त पाणी पिणे पुरेसे नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि योग्य जीवनशैली असणे गरज असते.

Healthy Foods | Canva

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Drinking Water | pinterest

Nankhatai Recipe: दिवाळीला घरच्या घरी प्रेशर कुकरमध्ये बनवा खुसखुशीत नानकटाई; वाचा सोपी रेसिपी!

Nankhatai Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा