Bundgarden Police Station, Pune अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

पुणे: पीएमपीच्या कंडक्टरकडून 17 वर्षीय तरुणीचा विनयभंग!

Pmpml च्या स्वारगेट ते विश्रांतवाडी या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणीचा वाहकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

पुणे: Pmpml च्या स्वारगेट ते विश्रांतवाडी या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणीचा वाहकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये (Bundgarden Police Station) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत किसन गोडगे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहकाचे (Conductor) नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. फिर्यादी तरुणीची स्वारगेट ते विश्रांतवाडी या मार्गावर बसने (PMPL Bus) प्रवास करत होती. यावेळी आरोपी तिच्या बाजुला थांबला आणि मोठ्या आवाजात तिच्यावर ओरडला. परंतु फिर्यादी काहीच न बोलता बाजूलाच उभी राहिली. दरम्यान, काही वेळानंतर बसमध्ये आलेल्या तिकीट चेकरकडे (Ticket Checker) या तरुणीने वाहकाच्या वर्तनाविषयी सांगत तक्रार केली.

हे देखील पहा-

दरम्यान, तिकीट चेकर निघून गेल्यानंतर फिर्यादीचा राग मनात ठेवत त्या आरोपीने तरुणीच्या कंबरेला हात लावला. तक्रारीनुसार, आरोपीने हा प्रकार तीन वेळेस केला. त्यानंतर घाबरलेल्या तरुणीने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल तक्रार नोंदवली. पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि त्या आरोपीला तातडीने अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईला अखेर दुसरं विमानतळ मिळालं- पीएम नरेंद्र मोदी

GK: भारतातील पहिली मेट्रो सेवा कशी आणि कुठे सुरु झाली? जाणून घ्या

Maharashtra Politics : कोल्हापुरात शिंदे गटाला मोठा झटका! बडा नेता करणार अजित पवार गटात प्रवेश

Zubeen Garg Death Case: गायक जुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी चुलत भावाला पोलिसांनी केली अटक; मनं सुन्न करणारे खुलासे आले समोर

BJP Leader Killed : भाजपच्या आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; पोलिसांनी सांगितलं धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT