Pimpri Chinchwad Building Collapse 
मुंबई/पुणे

Pune : इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १७ जण अडकले; नावं आली समोर, दबलेल्यांचा आवाज येतोय, ते जिवंत आहेत

Pimpri Chinchwad Building Collapse : पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो परिसरात मुसळधार पावसामुळे तीन मजली आरसीसी इमारत कोसळून १७ कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

Moshi building collapse, Pimpri Chinchwad accident : पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो परिसरात आज एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. ३ मजली असलेली आरसीसी (RCC) कॅन्टीन आणि कार्यालयाची इमारत अचानक कोसळली. मुसळधार पावसामुळे शेजारील कचऱ्याचा मोठा ढीग या इमारतीवर कोसळला आणि पाया खचल्याने संपूर्ण इमारत पत्त्यांसारखी जमिनीदोस्त झाली. या दुर्घटनेत १७ कर्मचारी ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. आतापर्यंत ४ जणांना वाचवण्यात आले आहे.

मोशी कचरा डेपो परिसरातील ३ मजली आरसीसी इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत तब्बल १७ कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अडकलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आता प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत सर्वात मोठी आणि दिलासादायक बाब म्हणजे ढिगाऱ्याखाली दबलेल्या काही कर्मचाऱ्यांचे आवाज बाहेर येत असून ते जिवंत असल्याचे निदर्शनास आले आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि पोलिसांकडून सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

बाहेर काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे :

१) अशोक गुप्ता

२) मुनिंद्र कुमार

३) चंद्रशेखर सिंग

४) दिनेश सुतार

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची नावे:

१. विजय सपकाळ

२. महेश कुंभार

३. दादासाहेब आरडे

४. रणवीर सिंग

५. सोमनाथ शेळके

६. महेश राऊत

७. सनी माने

८. राहुल गायकवाड

९. सुनील कोरके

१०. अक्षय सावंत

११. रामप्रताप चव्हाण

१२. शुभम पाटील

१३. सचिन दाबडगव

१४. भावेश वाणी

१५. सुजाता शिंदे

१६. रणजीत पाटील

१७. नागेश गायकवाड

मोशीमधील कचरा निर्मिती करणारी ही इमारत आहे. पावसाच्या पाण्यामुळे कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळला आणि ही दुर्घटना घडली. १५ ते १६ जण इमारतीत असण्याची शक्यता आहे. सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल आणि पालिका कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत. अडकलेल्यांना ऑक्सिजन पाठवण्याचे काम सुरू असून सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
विनय चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड

'आम्ही जिवंत आहोत...', ढिगाऱ्याखालून येतायत आवाज!

मोशीतील या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. सर्वात दिलासादायक आणि महत्त्वाची बाब म्हणजे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांचे आवाज बाहेर येत असून ते जिवंत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून तातडीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सर्व अडकलेले लोक सुरक्षित बाहेर निघतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीमध्ये पूर्णा मध्यम प्रकल्प विश्रोळी धरणाचे दोन दरवाजे उघडले

Jackfruit Pakora: संध्याकाळच्या नाश्त्याला काहीतरी वेगळं खायचंय? मग घरच्या घरी बनवा फणसाची भजी

Matheran Fort : माथेरानच्या कुशीत वसलाय 'हा' किल्ला, एकदा भेट दिल्यावर पुन्हा पुन्हा जावंसं वाटेल

मुंबईत दुर्दैवी घटना; लपाछपी खेळताना 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद

Better Sleep Tips: वारंवार कूस बदलतात पण रात्रीला झोपच येईना? मग करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT