Thunder saam
मुंबई/पुणे

Murbad Rain: गुरांना आसरा देणाऱ्यावर काळाचा घाला; १० वीत घवघवीत यश मिळवणाऱ्या मुलाच्या अंगावर वीज कोसळली

Shocking News Murbad: मुरबाड तालुक्यातील इंदे गावातील एका मुलाचा वीज पडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. यश रमेश लाटे असे मृत युवकाचे नाव असून, तो नुकताच दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता.

Bhagyashree Kamble

मुरबाड तालुक्यातील इंदे गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अंगावर वीज पडून एका १६ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. पुढील शिक्षणाची तो तयारी करत होता. मात्र आज संततधार सुरू असलेल्या पावसात तो घराबाहेर पडला आणि त्याच्या अंगावर वीज कोसळली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

सध्या राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. मुरबाड तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, या पावसानं बळी घेतले आहेत. या पावसामुळे एका मुलाचाही मृत्यू झाला आहे. यश रमेश लाटे असे १६ वर्षीय मुलाचे नाव आहे. तो मुरबाड तालुक्यातील इंदे गावातील रहिवासी होता.

यशने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. तो पुढील शिक्षणाची तयारी करत होता. दरम्यान, त्याच्यासोबत काल सायंकाळी दुर्देवी घटना घडली. मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे यश गुरे बांधण्यासाठी गोठ्यात गेला होता.

गुरे बांधण्यासाठी गोठ्यात गेला असताना, अचानक वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे यशच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्याची मागणी केली आहे. मुरबाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाने योग्य ती मदत आणि तपासणी करण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

Money Laundering Probe : ३,००० कोटींच्या प्रकरणात ईडीची धाड, मुंबईसह देशभरात १७ ठिकाणी छापे, ११० कोटी रुपये जप्त

Heavy Rain Mumbai: वसई-विरारसह मीराभाईंदर शहरात पावसाचा धुमाकूळ; रस्ते जलमय, नागरिकांची तारांबळ|VIDEO

Param Sundari: सिद्धार्थ-जान्हवीचा 'परम-सुंदरी' वादाच्या भोवऱ्यात, एका सीनमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी, वाचा नेमकं प्रकरण

GST: सर्वसामान्यांना दिलासा! १२ आणि २८ टक्के जीएसट रद्द होणार; या वस्तूंच्या किंमती होणार कमी

SCROLL FOR NEXT