Indapur, Accident, School, Student, Kati Village Saam tv
मुंबई/पुणे

Indapur : डंपरची बुलेटला धडक, मुलगी ठार; चालक पाेलिसांच्या ताब्यात

पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.

मंगेश कचरे

बारामती : इंदापूर (indapur) तालुक्यात रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी लागणाऱ्या मालाची वाहतूक करणाऱ्या डंपरनं (truck) शाळेत (school) जाणाऱ्या मुलीला डंपरनं चिरडल्याची घटना आज (शुक्रवार) काटी गावात घडली आहे. (Indapur Accident News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार इंदापूर तालुक्यातील काटी येथे बीकेबी एन रस्त्यावर आज सकाळी दहा वाजता डंपरने बुलेट गाडीला पाठीमागून धडक दिल्याने बुलेटवर मागे बसलेल्या बारा वर्षीय मुलगी डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने मृत्यूमुखी पडली. तृप्ती कदम (trupati kadam) असं संबंधित मुलीचे नाव आहे. ती शाळेत जात असताना ही घटना घडली आहे. काटी गावात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असताना मालाची वाहतूक करणाऱ्या डंपरनं तृप्तीला चिरडल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Indapur News)

या अपघातानंतर संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला. त्यानंतर अग्निशमन दलाने पेटलेल्या डंपरची आग विझविली. या अपघाताप्रकरणी डंपर चालक विनोद महादेव जवरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे पाेलिसांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 फॉर्मेटचा नवा राजा! 3000 धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला; सूर्यकुमार फटकेबाजीचा बादशहा बनला

Iran Blast: इराणमध्ये मोठा स्फोट; ८ मजली निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली, संपूर्ण देशात खळबळ

दादांनी दूर ठेवलेले मुंडे, प्रकृतीमुळे बाजूला असलेले भुजबळ आता आघाडीवर, कारण काय? VIDEO

अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, ही माझी इच्छा, विलीनीकरणावर पवारांचं विधान, राष्ट्रवादी विलिनीकरणात तटकरे, पटेलांचा खोडा?

IND vs NZ T20: वनडेचा स्कोअर टी २० सामन्यात; न्यूझीलंडची कडक धुलाई, भारताच्या धुरंधरांनी पराभवाचा वचपा काढला

SCROLL FOR NEXT