Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Crime News : बिकिनीवर ऑडिशन द्यायला लावून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; पुण्यातील उद्योजकाचं क्रूर कृत्य

चाकण औद्योगिक क्षेत्रातील एका नामांकित उद्योजकाने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे.

रोहिदास गाडगे

Pune Crime News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींवरही अत्याचार झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अशीच घटना पुण्यातून समोर आली आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील एका नामांकित उद्योजकाने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे.  (Breaking Marathi News)

याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल (Crime News) केला आहे. गुन्हा दाखल होताच, आरोपी उद्योजक हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. राजेंद्र दगडु गायकवाड असं, या उद्योजकाचं नाव आहे.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी राजेंद्र हा त्यांच्या घरी आला होता. यावेळी त्याने पीडित मुलीला फिल्म इंडस्ट्रीज मध्ये काम देण्याचं अमिष दाखवलं. त्यानंतर आरोपीने ऑडिशन घेत असल्याचं कारण देत, पीडितेच्या आई-वडीलांना घरातून बाहेर पाठवलं.

आरोपीने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला कपडे उतरवायला लावले. पीडित मुलीने कपडे उतरवताच, आरोपीने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. (Latest Marathi News)

अत्याचारानंतर आरोपी राजेंद्र हा तेथून तातडीने निघून गेला. या सर्व प्रकारानंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने आपल्यावर अत्याचार झाल्याचं आई-वडीलांना सांगितलं. मुलीवर अत्याचार झाल्याचं लक्षात येताच, पीडितेच्या आई-वडीलांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठलं.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी राजेंद्र दगडु गायकवाड याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच, आरोपी राजेंद्र हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

SCROLL FOR NEXT