अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी
Pune Unauthorized schools News : शिक्षणाच्या पंढरीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत पुणे जिल्ह्यात १३ शाळा अनधिकृत (jilha parishad shala) असल्याचे उघड झाले असून, आणखी २४ शाळा मूळ जागेवर नसून दुसऱ्याच ठिकाणी सुरू असल्याचे आढळून आले आहे. शालेय वर्ष सुरू होण्याच्या दिवशीच ही माहिती समोर येताच पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पालकांना दक्षतेचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील शाळा आजपासून सुरू होत आहेत, त्याआधीच पुण्यातील अनधिकृत शाळांची माहिती समोर आली आहे. शासनाच्या मान्यतेविना प्रवेश प्रक्रिया व जाहिरात करणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. एस.पी. इंग्लिश मिडियम (वाघोली), कलर स्कूल (ताथवडे), माय स्कूल (ताथवडे), इमॅन्युअल पब्लिक स्कूल (हडपसर) अशा शाळांचा यात समावेश आहे
राज्य शासनाची आवश्यक मान्यता नसतानाही प्रवेश घेतला जात असेल अथवा जाहिरात करत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून कडक पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला पालकांकडून सहकार्य मिळावे असे जेडीपीच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील १३ शाळा पूर्णतः अनधिकृत असून, २४ शाळा शासनमान्यता असूनही मूळ जागेवर त्या चालू नाहीत, असे पुणे झेडपी शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. अनधिकृत शाळेवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
जिल्हा परिषदेने पालकांना शाळेत प्रवेश देताना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अधिकृत मान्यता असलेली शाळा निवडण्याचा सल्ला दिला आहे. लवकरच या शाळांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे झेडपी शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
एस.पी. इंग्लिश मिडियम स्कूल, वाघोली
कलर स्कूल, ताथवडे
न्यू विस्डम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे
किंग्जवे पब्लिक स्कूल, लोणावळा
माय स्कूल, ताथवडे
न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडिअम स्कूल, बिबवेवाडी
आयडियल पब्लिक स्कूल, धायरी
महात्मा गांधी प्रशाला
टीम्स तकवा इस्लामिक स्कूल ॲण्ड मक्तब, कोंढवा
सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा
इमॅन्युअल पब्लिक स्कूल, हडपसर
मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल, सोलापूर रोड
आर्यन वर्ल्ड स्कूल, नऱ्हे
राज्यभरातील शाळांना आजपासून सुरुवात होत आहे. पुणे मुंबई ठाणे नाशिक या शहरांसह राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शाळा आज सुरू होत आहेत. विदर्भ वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यात त आज विद्यार्थ्यांसाठी पहिला दिवस आहे. शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात अनेक पालक आपल्या पाल्यांसाठी विविध शाळांमध्ये ऍडमिशन घेतात. यासाठी पालकांकडून शाळा शोधण्याचे कार्य आजही काही प्रमाणावर सुरू आहे. असं असतानाच आता पुणे जिल्ह्यात तब्बल 13 शाळा अनाधिकृत असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.