100 Crore Recovery Case Saam Tv
मुंबई/पुणे

100 कोटी वसुली प्रकरण, चांदिवाल आयोगाची चौकशी पुर्ण; अवहाल राज्य सरकारला देणार

चांदीवाल आयोगाचे कामकाज पूर्ण झाले असून 22 मार्च रोजी हा अहवाल बनवून तो 23 मार्चला सीलबंद केला जाईल.

सुरज सावंत

मुंबई: शंभर कोटी वसुली प्रकरणात राज्य सरकारने नेमलेल्या चांदीवाल आयोगात सुनावणी पार पडली. मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांदीवाल आयोगासमोर आज हजर झाले होते. आजच्या शेवटच्या सुनावणीनंतर आयोग आपला निर्णय सीलबंद लिफाफ्यात महाराष्ट्र सरकारला सुपूर्द करणार आहे. चांदीवाल आयोगाची आज सुनावणी पूर्ण झाली आहे. चांदीवाल आयोगाचे कामकाज पूर्ण झाले असून 22 मार्च रोजी हा अहवाल बनवून तो 23 मार्चला सीलबंद केला जाईल. यानंतरहा अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार आहे. अनिल देशमुखांशी संबंधित 100 कोटी वसुली प्रकरणाची चांदीवाल आयोगाने चौकशी केली आहे.

दरम्यान 100 कोटी वसुली प्रकरणात सचिन वाझे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख अनेक दिवसांपासून कोठडीत आहेत. चांदिवाल आयोगाने अनिल देशमुश आणि सचिन वाझेंकडून चौकशी करुन अनेक धक्कादायक खुलासे केले होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. 100 कोटी वसुलीचे प्रकरण चालू असतानाच अँटिलीया केस, मनसुख हिरेन हत्या अशा घटना घडत होत्या. परंतु आता चांदिवाल आयोगाने 100 कोटी वसुली प्रकरणात काय चौकशी केली आहे. ते त्यांनी दिलेल्या अहवालातूनच उघडकीस येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT