मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 
मुख्य बातम्या

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचंच नव्हतं, पण ती घटना घडली

साम टीव्ही ब्युरो

गौरव साळुंके

श्रीरामपूर ः विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची अनपेक्षित युती झाली. कोणाच्या ध्यानीमनी नसताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटले होते. कारण एक तर सर्वाधिक जागा मिळवणारा भारतीय जनता पक्ष विरोधी बाकावर बसला होता. दुसरे म्हणजे ठाकरे घराण्यातील व्यक्ती सरकारमध्ये बसली होती. यामागील गुपित मृदा व जससंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी जाहीरपणे सांगितलंय.

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात नुकताच शिवसंपर्क अभियानाला प्रारंभ झाला आहे. याच पार्श्वभूमीवर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये मृदा व जलसंधारण राज्यमंत्री शंकरराव गडाख, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूर तालुक्यात शिवसंपर्क अभियाला सुरवात झाली. त्यावेळी राज्यमंत्री गडाख बोलत होते.Uddhav Thackeray became the Chief Minister due to harassment by BJP

प्रारंभी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे व खासदार सदाशिव लोखंडे यांची भाषणे झाली.

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची आजिबात इच्छा नव्हती. मात्र, मागील पाच वर्षांत भारतीय जनता पार्टीचा शिवसेनेला कटू अनुभव आल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करुन मुख्यमंत्री झाल्याचा गौप्यस्फोट मंत्री गडाख यांनी केला.

मंत्री गडाख म्हणाले, इतर राजकीय पक्ष निवडणुका समोर आल्यानंतर शेतकऱ्यांची खोटी कर्जमाफी करतात. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी सत्तेत आल्यानंतर प्राधान्याने शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न सोडविला. तसेच सरकार स्थापन झाल्यानंतर ते अनेक धडाडीचे निर्णय घेणार होते. परंतु कोरोनाच्या संकटामुळे त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले.

कोरोनाच्या संकटात केंद्रातील सरकारसारख्या थाळ्या राज्य सरकारने वाजविल्या नाहीत. तर प्रमाणिकपणे काम करून कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वेळोवेळी जनतेसमोर येऊन कुटूंबातील एका व्यक्तीप्रमाणे मार्गदर्शन करुन जनतेला कोरोनातून सावरले. त्यामुळे राज्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याचे राज्यमंत्री गडाख यांनी सांगितले. तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे यांनी आभार मानले. तर उपतालुका प्रमुख प्रदीप वाघ यांनी सूत्रसंचालन केले.Uddhav Thackeray became the Chief Minister due to harassment by BJP

Edited By - Ashok Nimbalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

SCROLL FOR NEXT