Sanjay Raut  Saam TV
मुख्य बातम्या

शरद पवारांवरील चिखलफेक महाराष्ट्र सहन करणार नाही : संजय राऊत

जयश्री मोरे

मुंबई : महाराष्ट्रात सुरु असलेले असंस्कृत राजकारण थांबले पाहिजे अन्यथा ही लढाई अत्यंत वाईट मार्गावर जाईल असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नमूद केले. माध्यमांशी संवाद साधताना खासदार राऊत म्हणाले महाविकास आघाडीचे राजकीय नेते आणि त्यांच्या नेत्यांना ज्या प्रकारे त्रास दिला जात आहे ते यापुर्वी घडले नव्हते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुसंस्कृत राजकारण केले. त्यांच्यावर हाेत असलेली चिखलफेक महाराष्ट्र सहन करणार नाही हे विराेधकांनी समजून घ्यावे अन्यथा ही लढाई वाईट मार्गावर जाईल असेही राऊत यांनी नमूद केले. sanjay raut maharashtra politics sharad pawar devendra fadnavis nawab malik

खासदार राऊत म्हणाले महाराष्ट्रात आता अफू गांजाची शेती पिकतेय का? अशी शंका देशात वाढू लागली आहे. नवाब मलिकांच्या भावना मी समजू शकतो. गेल्या काही महिन्यांत त्यांनी बरच भोगलंय. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. सर्व काही खाेटे आराेप केले जात आहे. तपास यंत्रणेचा गैरवापर करुन त्रास दिला जात आहे. राजकीय विराेधकांना अशा प्रकारे संपविण्याचा प्रकार कधीच घडला नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आता शरद पवारांवरही खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. देवेंद्र फडणवीस जर पत्रकार परिषद घेणार असतील तर त्यांनी यावर बोलायला हवं. आम्ही संयम बाळगून आहोत, तो सोडायला लावू नका. नाहीतर ही लढाई अत्यतं वाईट मार्गावर जाईल.

राजकारणात एकच सांगितले जाते. हमाम मे सब नंगे हाेते है. जिनके घर शिशे के होते है, वह दुसरो के घरोपर पत्थर नही फेंकते असे म्हणत राऊत यांनी आमच्या देखील हातात दगड असू शकतात अन् तुमच्याही काचा फुटू शकतात. आम्ही अजून संयम बाळगून आहाेत. कमरे खालचे वार शिवसेनेने केलेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप यांची भेट झाली त्यावर खासदार राऊत म्हणाले हिंदूना सर्व धर्म पवित्र आहेत. ते सर्व धर्मांचं संरक्षण करतात. मोदी तिकडे गेले, त्यांनी पोपला इथं बोलावलंय, त्यांचे स्वागतच आहे.

दादरा नगर हवेलीतून उद्या तिथले खासदार मुंबईत विजयी जल्लोष करण्यासाठी येतील याची आम्हांला खात्री आहे असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. नवाब मलिक यांनी आज एक माेठे प्रकरण बाहेर आणले आहे. त्यातील ज्यांच्यावर आराेप केले जाताहेत त्यांनीच उत्तर द्यावे असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT