Saam Impact
Saam Impact 
मुख्य बातम्या

ओली पार्टी करणारे शिक्षक निलंबित; मुख्याध्यापकावर कारवाई

संजय जाधव

बुलढाणा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या दाेन शिक्षकांनी मद्यप्राशन करुन शाळेच्या आवारात पार्टी केल्याचे वृत्त गुरुवारी साम टीव्हीने प्रसारित केल्यानंतर त्याची दखल बुलाढाणाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी घेत दाेन्ही शिक्षकांना तातडीने निलंबित केले. याबराेबरच अन्य एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकास कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिलेल्या माहितीनूसार मुख्याध्यापक इरफान सुरतने, शिक्षक शांताराम चव्हाण, मनाेज ठाेंबरे अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. principal-two-teachers-suspended-in-buldhana-saam-tv-news-impact-sml80

काेविड 19 च्या काऴात राज्यातील सर्व प्राथमिक शाळा गेली दीड वर्ष बंद आहेत. परंतु शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचे बंधन आहे. सध्या शिक्षकांवर कूठल्याही कामाची जबाबदारी नसल्याने ते बिनधास्त मौज मस्ती करतानाचे नुकतेच बुलढाणा जिल्ह्यात आढळून आले. या भागातील शिवनी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी चक्क स्वयंपाक घरातच मटणाची पार्टी करुन मद्यप्राशन केल्याचे वृत्त साम टीव्हीने प्रसारित केले. त्यानंतर बुलढाणा जिल्हा परिषदसह राज्यातून संबंधित शिक्षकांच्या या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात आला.

अन्य एका घटनेत हड़िया महल या गावातील प्राथमिक शाळेत अस्वच्छता दिसून आली. या घटनेची देखील सविस्तर बातमी सांम टीव्हीने प्रसारित केले. या दाेन्ही बातम्यांची दखल Saam Impact जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने घेतली. शिक्षण विभागाने देखील या घटनांची चौकशी करण्याचे आदेश धाडले.

शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी शिक्षक शांताराम चव्हाण, मनाेज ठाेंबरे यांना शाळेच्या परिसरात मद्यप्राशन करुन मटणाची पार्टी करुन अशोभनिय वर्तन केल्याबद्दल शिक्षक पदाचे कर्तव्यात कसुर करुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा(वर्तणुक) नियम १९६७ मधिल नियम ०३ चा भंग केल्यामुळे शिस्तभंगविषयक कार्यवाही पात्र ठरत आहे. या कारणावरून निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश दाेन्ही शिक्षकांना ठाेठावला आहे.

याबराेबरच मुख्याध्यापक इरफान सुरतने यास प्राथमिक शाळेत अस्वच्छता दिसून आल्याने तसेच कर्तव्यात कसूर केल्याने शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी त्यास निलंबित केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

Today's Marathi News Live: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी भाजपचं आंदोलन

RR-KKR चा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर? कोणाचं होणार नुकसान?

Sangli News: पैज लावाल तर तुरुंगात जाल! निकालावरुन पैज लावणं अंगलट आलं, सांगलीत दोन मित्रांच्या गाड्याही जप्त

Anti Diet Plan म्हणजे काय? कोणासाठी आहे फायदेशीर

SCROLL FOR NEXT