RR-KKR चा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर? कोणाचं होणार नुकसान?

IPL Rajasthan Royals and Kolkata Knight Riders : आयपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. पावसामुळे या सामन्यात नाणेफेक होऊ शकली नाही. पावसात हा सामना वाहून गेला तर काय होईल? याचा संजू सॅमसनच्या संघावर काय परिणाम होईल का? हे जाणून घेऊ.
RR-KKR चा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर? कोणाचं होणार नुकसान?
IPL Rajasthan Royals and Kolkata Knight Ridersfile

नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलमधील ७० वा सामना होणार आहे. परंतु सामन्याआधी गुवाहाटीच्या स्टेडियमवर पावसाने बॅटिंग सुरू केल्यामुळे हा सामना सुरू होऊ शकला नाहीये. मुसळधार पावसामुळे या सामन्यात नाणेफेक अद्याप होऊ शकलेली नाहीये. हा सामना होण्याने आणि न होण्याने मोठा पॉईंट्स टेबलमध्ये फरक पडणार आहे.

आयपीएलचा हा शेवटचा लीग सामना नेट रेटच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून राजस्थान रॉयल्सचा संघ प्लेऑफमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकतो. जर रहा सामना राजस्थान संघाने जिंकल्यास दुसऱ्या स्थानावर असताना त्यांना क्वालिफायर वनमध्ये खेळावे लागेल. या सामन्यात विजय किंवा पराभवाने केकेआरला काहीही फरक पडणार नाहीये. जर राजस्थान रॉयल्सविरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांमध्ये एक-एक गुण दिले जातील.

याचाच अर्थ राजस्थान आणि हैदराबाद संघाकडे १७-१७ गुण समान असतील. पण नेट रनरेटच्या आधारे राजस्थान तिसऱ्या स्थानावर राहील. तर हैदराबाद दुसऱ्या स्थानावर राहील. राजस्थानचा नेट रन रेट ०.२७३ आहे तर हैदराबादचा नेट रन रेट ४१४ आहे. सामन्यात नाणेफेक संध्याकाळी ७ वाजता होणार होती मात्र अजूनही सामना सुरू झालाय.

राजस्थान रॉयल्स सुरुवातीला १० सामन्यांनंतर पॉईंट् टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. यानंतर सलग तीन सामने हरले. यामुळे संघाची आता तिसऱ्या क्रमांकावर घसरण झालीय. दुसरीकडे कोलकाता पहिल्या क्रमांकावर असताना क्वालिफायर १ खेळण्याची खात्री झालीय. राजस्थानच्या संघाला दुसऱ्यास्थानी जाण्यासाठी मिळवायचं आहे.

कारण येथे त्यांना अंतिम फेरीसाठी दोन संधी मिळतात. क्वालिफायर वनच्या विजेत्याला अंतिम फेरीचे थेट तिकीट मिळते. तर पराभूत संघाला अंतिम फेरीसाठी आणखी एक संधी मिळते. तिसरा क्रमांक मिळवणारा संघ थेट एलिमिनेटरमध्ये जातो. त्याच्यासाठी हा सामना करा किंवा मरो सारखा आहे. कारण कोणताही संघ हरला तर त्या संघाची अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंग पावणार आहे.

RR-KKR चा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर? कोणाचं होणार नुकसान?
Csk vs Rcb: आरसीबीचं सेलिब्रेशन माहीला पाहावे ना? हस्तांदोलन न करताच परतला धोनी

दरम्यान सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा ४ गडी राखून पराभव करत दुसरे स्थान पटकावलं. हैदराबादने ५ चेंडू बाकी असताना २१५ धावांचे लक्ष्य पार केलं. या विजयासह हैदराबादने आपल्या नेट-रेटमध्येही सुधारणा केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com