साता-यात 'या' मार्गावर वन वे; पार्किंग व्यवस्थेतही बदल

satara
satara
Published On

सातारा : गणेशाेत्सवाच्या ganeshotsav 2021 पार्श्वभुमीवर सातारा शहरातील वाहतुक व्यवस्थेत अनंत चतुर्दशीपर्यंत (ता.१९) बदल करण्यात आला आहे. पाेलिस अधीक्षक अजकुमार बन्सल यांच्या आदेशान्वये केलेल्या बदलाची माहिती वाहतुक शाखेचे सहायक पाेलिस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी माध्यमांना दिली. शेलार म्हणाले नागरिकांनी सातारा satara शहरातील वाहतुक व्यवस्थेत केलेला बदलांनूसार आपली वाहने त्या त्या स्त्यावर न्यावीत. satara-traffic-diverted-parking-slots-decleared-ganeshotsav-2021-sml80

satara
त्याक्षणी बाळासाहेब भिलारेंनी वचन देताच मकरंद पाटील गहिवरले

नव्या बदलानुसार नागरिकांना राजवाडा येथून माेती चाैक मार्गे समर्थ चित्रपटगृहापर्यंत वाहने घेऊन जाता येईल. समर्थ चित्रपटगृह मार्गे येणा-या वाहनधारकांनी माेती चाैकात न जाता विद्युत वितरण कार्यालय (एमएसईबी कार्यालय) सुरुची बंगला मार्गे राजवाडा येथे जावे. मारवाडी चाैक ते सम्राट चाैक या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे.

पार्किंगची अशी राहील व्यवस्था

माेती चाैक ते जूना माेटार स्टॅन्ड या मार्गावर नागरिकांनी दक्षिण दिशेला वाहने लावावीत.

जूना माेटार स्टॅन्ड ते शेटे चाैक आणि शेटे चाैक ते राजाराम भुवन या मार्गावर उत्तर दिशेला वाहने लावावीत.

माेती चाैक ते राधिका चित्रपटगृह मार्गावर दक्षिण दिशेस वाहने लावावीत.

माेती चाैक ते देवी चाैक या मार्गावर दक्षिण दिशेस वाहने लावावीत.

प्रिया व्हरायटी चाैक ते कासट मार्केट मार्गावर दक्षिण दिशेस वाहने लावावीत.

माेती चाैक ते शेटे चाैक आणि माेती चाैक ते समर्थ चित्रपटगृह मार्गावरील रहिवाशांनी त्यांची वाहने पर्यायी ठिकाणी लावावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com