Bharat Jadhav
वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग फॉलो करतात. व्यायाम करण्यासह कमी प्रमाणात आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.
अनेकवेळा डाएटिंगमुळे शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. यामुळे आरोग्याचीही हानी होते.
वजन कमी करण्यासाठी वेळेवर खाणे, मर्यादित प्रमाणात खाणे आणि काही वेळा दीर्घकाळ उपाशी राहणे सोपं नाही. पण त्याऐवजी तुम्ही अँटी डाएट प्लॅन फॉलो करू शकता.
याला माइंडफुल इटिंग असेही म्हणतात. अँटी डाएट प्लॅनमध्ये तुम्हाला सजगपणे खाण्याचा सराव करावा लागतो.
तुमच्या शरीरासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. कोणत्या गोष्टींमुळे वजन कमी होईल, या सर्व गोष्टींचा विचार केला जातो.
जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हाच तुम्ही खा. कोणत्याही प्रकारचे भोजन जास्त प्रमाणात खाऊ नये.
सतत खात राहू नका आणि जास्त साखर असलेले पदार्थ टाळा. भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पदार्थांचे सेवन करू नका म्हणजे तुम्हाला काही फास्ट फूड खाण्याचा विचार झाला तर लगेच खाऊ नका.
वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.
येथे क्लिक करा