दारुचा धंदा सोडून दारुविक्रेता बनला चहा विक्रेता... - Pramod Jagtap
मुख्य बातम्या

दारुचा धंदा सोडून दारुविक्रेता बनला चहा विक्रेता...

दारुविक्रेत्याला तर दररोज शिव्या शापांचा मार सहन करावा लागतो... दारुच्या व्यवसात पैसेही चांगले मिळतात... त्यामुळ सहसा असा व्यवसाय कोणी सोडणार नाही... पण कर्जतमधल्या हातभट्टीची दारु विकणा-या बाळासाहेब मानेनं मात्र धंदाच बदललाय

साम टिव्ही ब्युरो

- प्रमोद जगताप (साम टिव्ही)

नगर : दारू Liqour म्हटलं की डोळ्यासमोर येते ती संसाराची झालेली राखरांगोळी, घरात अठरा विश्व दारीद्र, मुलाबाळांच्या शिक्षणाची हेळसांड, घरात दररोजचीच सुरू असलेली मारामारी... दारू पिणाऱ्यावर समाज भडकतोच पण दारू विक्रेत्यावरही याचे पडसाद उमटतात..दारूतून मिळणाऱ्या पैशांचा Money मोह सुटणे कठीण...पण नगर जिल्ह्यातल्या एका दारूविक्रेत्यानं वेगळं उदाहरण घालून देत चक्क आपला दारू विक्रीचा व्यवसायच सोडला...Boot lager became tea stall owner in Nagar

दारुविक्रेत्याला तर दररोज शिव्या शापांचा मार सहन करावा लागतो... दारुच्या व्यवसात पैसेही चांगले मिळतात... त्यामुळ सहसा असा व्यवसाय कोणी सोडणार नाही... पण कर्जतमधल्या Karjat हातभट्टीची दारु विकणा-या बाळासाहेब मानेनं मात्र धंदाच बदललाय..नगर जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये घडलीय... कसा झाला नगरच्या Nagar बाळ्याचा बाळासाहेब पाहुयात खास रिपोर्टमधून...

बाळासाहेब माने या पूर्वी दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यानं तो सोडून चक्क त्यानं चहाचा व्यवसाय सुरू केला... तोही पोलिसांच्या Police मदतीनं.... त्याच झालं असं की मागच्या काही महिन्यांपुर्वी कर्जत शहरात डॅशींग पोलिस अधिकारी चंद्रशेखर यादव यांची बदली झाली.... तेंव्हापासून दोन नंबरच्या सगळ्या धंद्यांना त्यांनी चाप लावायला सुरू केली...

कुठं वाळूच्या गाड्यांवर कारवाई, कुठ दारुच्या गुत्यांवर छापा तर कुठ पत्याच्या अड्यावरच्यांची धरपकड... हे सगळ करत असताना त्यांनी हातभट्टीची दारु विकणा-या बाळासाहेब माने याच्यावरही कारवाई केली... पण त्याला पकडल्यावर बाळासाहेबानं जे सांगीतल त्यामुळ यादव यांनी त्याला व्यवसाय करण्याचा सल्ला दिला आन् त्याला उभ रहायला मदतही करण्याचं अश्वासन दिल...Boot lager became tea stall owner in Nagar

कोणतीही व्यक्ती वाईट नसते, वाईट असते ती परिस्थिती... अन् ती परिस्थीती त्याला वाईट काम करायला भाग पाडते... पण समाजानं त्यांना समजून घेतलं, त्यांच्यावर विश्वास दाखवला तर त्या चुकीचं वागणाऱ्या माणसांचही परिवर्तन होऊ शकतं हे या गोष्टीतून दिसून येतं... काही दिवसांपूर्वी ज्या पोलिसांनी बाळासाहेबाच्या अवैध धंद्यावर छापा टाकून त्याला दांडक्याचा प्रसाद दिला होता तेच पोलिस आज त्याच्या टपरीवर येऊन चहा पिताहेत हे पहाताना त्याचेही डोळे पाणावल्याशिवाय राहिले नसतील....

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT