BJP-Shivsne Dispute: नोटीस न येताच ईडीची कारवाई सुरु आहे  Saam tv News
मुख्य बातम्या

BJP-Shivsne Dispute: नोटीस न येताच ईडीची कारवाई सुरु आहे

सात कोटी रुपये आले कोठून असा प्रश्न भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

Anuradha Dhawade

वाशिम - किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी केलेल्या तक्रारमध्ये कितीही चौकशी केली तरी यामध्ये काही आढळणार नाही. शिवसेनेच्या (Shivsena) मागे विनाकारण ईडी (ED) लावत असल्यचा आरोप शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी केला आहे. त्याच बरोबर कारंजाचे भाजप आमदार यांनी वाशिम मध्ये 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे पुरावे दिले, मात्र त्यावर चौकशी लागली नाही. त्यांची पण चौकशी झाली पाहिजे, असंही खासदार गवळी यांनी म्हटलं आहे. भाजप शिवसेनेला टार्गेट करीत आहे. ईडीकडून नोटीस न येताच ईडीची कारवाई सुरु असल्याचा दावाही देखील भावना गवळी यांनी केला आहे.

हे देखील पहा-

यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांनी 2019 मध्ये चोरीला गेलेल्या सात कोटी रुपयांच्या चोरीची फिर्याद 2020 मध्ये दिली. मात्र सात कोटी रुपये आले कोठून असा प्रश्न भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. सोबतच खासदार भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्या संदर्भात केलेल्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप देखील यावेळी सोमय्या यांनी केला आहे. आज खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर ईडीचे अधिकारी पोहोचले असून चौकशी सुरू आहे.

जनशिक्षण संस्था वाशिम व महिला उत्कर्ष प्रतिष्ठान रिसोड यांच्या कार्यालयातील जुलै 2019 मध्ये संस्थेचे महत्वाच्या कागदपत्रांसह संस्थेतील सात कोटी रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती माजी शिवसेना नगरसेवक हरीश सारडा यांनी किरीट सोमय्या यांना दिल्यानंतर त्यांनी चोरी गेलेली रक्कम ही हायवे ठेकेदार यांच्याकडून घेतलेली आहे का? असा आरोप करीत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे. त्यामुळं पुन्हा एकदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ४११६ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Local Body Election : काँग्रेस जिल्हाअध्यक्षाचे अपहरण अन् मारहाण, VIDEO ने महाराष्ट्रात खळबळ, हिंदुत्ववादी संघटनेवर आरोप

गुवाहाटी टेस्टमधील पराभव जिव्हारी लागणार, WTC Points Table मध्ये पाकिस्तानच्या खाली जाणार भारत, पाहा समीकरण

Mahayuti: अजित पवारांच्या आमदाराकडून काँग्रेसचा प्रचार, महायुतीतील संघर्ष टोकाला

Chanakya niti: दुपारच्या वेळेस का झोपू नये? चाणक्यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

SCROLL FOR NEXT