BREAKING: Waze ला कोठडी नाही; खासगी रुग्णालयात होणार हृदयशस्त्रक्रिया

उपचारानंतर १५ दिवसात वाजेवर काय उपचार करण्यात आले त्याची कागदपत्र जमा करण्याचे आदेश न्यायाधिशांनी दिले आहेत.
BREAKING: Waze ला कोठडी नाही; खासगी रुग्णालयात होणार हृदयशस्त्रक्रिया
BREAKING: Waze ला कोठडी नाही; खासगी रुग्णालयात होणार हृदयशस्त्रक्रियाSaam Tv news

सुरज सावंत

अँटिलियाबाहेर स्फोटक प्रकरणी (Mukesh Ambani Antilia Bomb Scare) आज न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान आरोपी सचिन वाजेच्या (Sachin Waze) वकिलांनी कोकीळाबेन, सुराना किंवा सेफी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्याची विनंती केली. यावेळी अचानक वाजेंना न्यायाधिशांनी मानेशी बोलत असल्याने फटकारले. या दोघांना न्यायाधिशांनी (Judge) आरोपींच्या बसण्याच्या जागेवर पाठवलं. त्यावेळी दोघेही एकमेकांच्या जवळ बसून बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्या वेळी दोघांना फटकारत अंतर ठेवण्यास सांगितले.

हे देखील पहा-

दरम्यान, NIAने कोर्टाकडे सचिन वाजेच्या २ दिवसांची व सुनिल मानेच्या ४ दिवसांच्या कस्टडीची मागणी केली. या गुन्ह्यात ३० दिवस कस्टडी मिळते. त्यानुसार सचिन वाजेची २८ दिवस कस्टडी झालेली असून २ दिवस कस्टडी बाकी आहे. तर सुनिल मानेची १४ दिवस कस्टडी झालेली आहे. त्यामुळे मानेची ४ दिवस कस्टडी मागण्यात आली आहे.

मात्र दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर तपासादरम्यान काही महत्वाचे पुरावे NIA च्या हाती लागलेले आहे. हे पुरावे एका संशयित आरोपीचे आहेत. त्या अनुशंगाने तपास करणे गरजेचे आहे. त्यानुसार दोघांची कस्टडी मिळणे गरजेची आहे. आरोपींकडे मोठ्या प्रमाणात रोक रक्कम हस्तगत करण्यात आली होती. पैशांचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यानुसार दोघांकडे चौकशी करायची असल्याचा युक्तीवाद NIA कडून करण्यात आला.

BREAKING: Waze ला कोठडी नाही; खासगी रुग्णालयात होणार हृदयशस्त्रक्रिया
हिंदू सणांवर निर्बंध हाच ठाकरे सरकारचा अट्टहास: रवींद्र चव्हाण

त्याचबरोबर, मनसुखच्या हत्येमध्येही त्या संशयित आरोपीचा सहभाग असल्याचे पुरावे हाती लागले आहे. त्यामुळे दोघांच्या कस्टडीची मागणी NIA कडून मागण्यात आली आहे. सचिन वाजे यांच्यावर ह्रदयविकाराची शस्त्र क्रिया करणे गरजेचे आहे. त्याचा ह्रदयात ३ ब्लॉक आहेत. जे ९० % हून अधिक आहेत.

याबाबत उपचारा नंतर १५ दिवसात वाजेवर काय उपचार करण्यात आले, त्याची कागदपत्रे जमा करण्याचे आदेश न्यायाधिशांनी दिले आहेत. तसेत सचिन वाजेला चालताना त्रास होत असल्याने व्हिल चेअरच्या केलेल्या मागणीला न्यायालयाने परवानगी दिली आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com