महाराष्ट्र

महिला ग्रामपंचायत सदस्यास मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची हकालपट्टी! (Video)

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : खामगाव राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अंबादास हिंगणे (NCP Leader Ambadas Hingane) यांनी तालुक्यातील आमसरी ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यास अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच तालुक्याचे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भारत लाहुडकर हे एका हत्या प्रकरणात कारागृहात आहेत. आता अशातच नवनियुक्त राष्ट्रवादी तालुका अध्यक्षाने महिलेस मारहाण करून अजूनही तालुक्यात राष्ट्रवादीची दादागिरी दाखविल्याने संताप व्यक्त होत आहे.

हे देखील पहा :

चिखली-आमसरी येथील महिला सदस्य विशाखा धुरंधर ह्या कामानिमित्त जात असताना (NCP ) तालुका अध्यक्षाने आपल्या साथीदारांसह मारहाण केली असा आरोप पीडित महिलेने केला आहे. यावरून जलंब पोलिसांनी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अंबादास हिंगणे सह पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता.

ग्रामपंचायत (Grampanchyat) सदस्य असणाऱ्या महिलेला मारहाण झाल्याची बातमी साम टीव्ही वर प्रसारित होताच बातमीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुलढाणा (Buldhana) जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांनी खामगाव (Khamgaon) तालुका अध्यक्ष अंबादास हिंगणे पाटील यांची तालुकाध्यक्ष पदावरून तातडीने हकालपट्टी केली आहे. तालुका अध्यक्ष पदाचा पदभार काढून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष श्री. धोंडीराम खंडारे यांना प्रभारी अध्यक्ष करण्यात आले आहे.

चिखली-आमसरी येथील गट ग्रामपंचायत सदस्य (Woman Grampanchayat Member) सौ. धुरंदर यांच्यावरील हल्ला प्रकरण, शिक्षकांना त्रास देण्याचे प्रकरण, यासह अनेक बाबींचा खुलासा वरिष्ठांचा समोर झाला आल्याने त्यांचा हा पदभार श्री.खंडारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : प्रमोद महाजन असते तर मोदी पंतप्रधान असते का? इंडिया आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

Benifits of Curry leaves: सकाळी उठल्यावर कढीपत्याचे पाणी प्या; आरोग्याला होतील अनेक फायदे

Raj Thackeray Demands: मुंबई-गोवा महामार्ग, रेल्वे अन् बरंच काही; भरसभेत राज ठाकरेंच्या PM मोदींकडे या महत्त्वाच्या मागण्या

Today's Marathi News Live: दिल्लीत हरवता येत नाही म्हणू माझ्या अटकेचं कारस्थान, अरविंद केजरीवाल यांचा गंभीर आरोप

PM Modi Speech: काँग्रेसने देशाची ५ दशकं वाया घालवली; शिवाजी पार्कातून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT