zilla parishad school principal and teacher found drunk video viral in chandrapur saam tv
महाराष्ट्र

Zilla Parishad School : मुख्यध्यापक, शिक्षक मद्यधुंद अवस्थेत, विद्यार्थ्यांनी धाडसाने काढला व्हिडिओ, पालकांची शिक्षण विभागात धाव

शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क शाळेतच दारूच्या बाटल्या व बिडी बंडल व खर्रा अशा पदार्थांसह बेधुंद शिक्षकांचे अवतार बघायला मिळू लागल्याने पालक संतप्त झाले.

संजय तुमराम

Chandrapur News :

मुख्याध्यापक व शिक्षक शाळेत सतत दारू पिऊन येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आज संतापलेल्या पालक व विद्यार्थ्यांनी चंद्रपूर शिक्षण विभागात संबंधितांची तक्रार केली. दरम्यान विद्यार्थ्यांनी बेधुंद अवस्थेत असलेल्या शिक्षकांचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन ताे शिक्षण विभागात देणार असल्याचे म्हटले आहे. (Maharashtra News)

चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व पालकांनी मद्यधुंद मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या सततच्या सवयीला लगाम बसावा यासाठी एक माेठं पाऊल उचलले. त्यांनी मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकाचा शाळेत मद्यधुंद अवस्थेत आल्यानंतर त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.

उत्तम विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेत तीन शिक्षक कार्यरत असून यातील हे दोन शिक्षक शाळेत मद्यपान करून येत असतात. शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क शाळेतच दारूच्या बाटल्या व बिडी बंडल व खर्रा अशा पदार्थांसह बेधुंद शिक्षकांचे अवतार बघायला मिळू लागल्याने पालक व विद्यार्थ्यांनी मिळून त्यांचा चांगलाच समाचार घेतला. या मद्यपी शिक्षकांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन शिक्षण विभागाने संतप्त पालकांना दिले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Government Scheme: या सरकारी योजनेत लाडक्या बहिणींना मिळतात २ लाख रुपये; मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आहे तरी काय?

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT