Satara News  Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : महिला असल्याचं भासवून तरुणाशी चॅटिंग, मारहाण करून लुटले; मनसे तालुकाध्यक्षासह युट्युबर, तडीपार गुंडाचा प्रताप

Satara Phaltan News : फलटणमध्ये बनावट इंस्टाग्राम अकाउंटवरून महिला असल्याचे भासवून एका युवकाला चॅटिंगद्वारे सापळ्यात ओढण्यात आले. त्यानंतर वीर धरण परिसरात त्याला मारहाण करून लुटण्यात आले. पोलिसांनी अवघ्या काही तासांत युट्युबर, मनसे तालुकाध्यक्ष आणि तडीपार आरोपीला अटक केली.

Alisha Khedekar

फलटणमध्ये बनावट इंस्टाग्राम अकाउंटवरून युवकाला बोलावून लूट व मारहाण

युट्युबर आणि मनसे तालुकाध्यक्ष यांच्यासह तीन आरोपी अटकेत

एक तासांत आरोपींना बेड्या

सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून

सोशल मीडियाने शाळकरी मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंतच्या नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे. मात्र त्याचा अतिरेक झाला किंवा त्याच्या माया जाळ मध्ये आणखी गुंतत गेलो तर फार हानिकारक ठरू शकत. अशाच प्रकारची धक्कादायक घटना साताऱ्यातील फलटण येथे घडली आहे. बनावट इंस्टाग्राम अकाउंट वरून महिला असल्याचे भासवून फलटण येथील युवकाला चॅटींग द्वारे एका ठिकाणी बोलावण्यात आले. त्यानंतर तीन जणांनी मारहाण करत त्या तरुणाला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर काही तासात पोलिसांनी लुटारूंना बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्यांमध्ये युट्युबर, सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेला संशयित आणि धक्कदायक म्हणजे मनसे तालुकाध्यक्षाचा हात असल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील फलटण तालुक्यात एका ३५ वर्षीय युवकासोबत तीन तरुणांनी बनावट इंस्टाग्राम अकाऊंटवरून महिला बोलत असल्याचं भासवून चॅटिंग केली. यानंतर काही दिवसांनी या तीन तरुणांनी पीडित युवकाला एका अज्ञात स्थळी बोलावण्याचा घाट रचला. त्यानुसार चॅटींग द्वारे या युवकाला हल्लेखोर तरुणांनी वीर धरण परिसरात बोलावून घेतलं.

पीडित तरुण हल्लेखोरांच्या जाळ्यात फसला. हल्लेखोरांनी पीडित तरुणाला मारहाण केली. येवढ्यावरच न थांबता या तिघांनी मारहाण करत तरुणाला लुटलं. यानंतर संबंधित युवकाने शिरवळ पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी तापाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी या तिघांनाही बेड्या ठोकल्या.

अटक केलेल्यांपैकी युट्युबर किरण मोरे, सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेला संशयित विशाल जाधव आणि मनसे तालुकाध्यक्ष इरफान शेख यांचा समावेश आहे.या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच आरोपींकडून याआधीही असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशा प्रकारे अजून कोणाची तक्रार असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SA20 लीगचा चौथा सिझन डिसेंबरपासून; 26 डिसेंबर ते 25 जानेवारी 2026 दरम्यान रंगणार सामने

Shocking: शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार! नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाचा जीव घेतला, ८ जण गंभीर

Maharashtra Live News Update: उदगीर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याची अरेरावी

Bihar Exit Polls : भाजपला मोठा धक्का; बिहारमध्ये तेजस्वी यादव धोबीपछाड देणार, एग्झिट पोलचा अंदाज

दिल्लीत स्फोट, महाराष्ट्रात धागेदोरे? डॉ. शाहीनाचं मुंबई कनेक्शन?

SCROLL FOR NEXT