youths walk barefoot from tuljapur to akkalkot for manoj jarange patil health
youths walk barefoot from tuljapur to akkalkot for manoj jarange patil health Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil यांचं आरोग्य चांगलं राहू द्या, युवकांचा तुळजापूर ते अक्कलकोट पायी प्रवास

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगे सोयरे कायदा करण्यासाठी सरकारला सद्बुद्धी दे, मनोज जरांगे पाटील यांचे आरोग्य चांगले राहु दे यासाठी धाराशिव येथील दोन युवकांनी पायी वारी सुरु केली आहे. ही वारी तुळजापूर ते अक्कलकोट अशी असणार आहे. हे युवक स्वामी समर्थचरणी साकडे घालणार असल्याचे त्यांनी नमूद केले. (Maharashtra News)

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा लढा गेल्या सहा महिन्यांपासुन सुरू आहे. जरांगे यांनी सातत्याने उपोषण केल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. तरीही जरांगे पाटील यांनी 4 जुन पासुन उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मनाेज जरांगे पाटील यांची प्रकृती ठणठणीत राहावी यासाठी धाराशिव मधील दोन युवकांनी तुळजापूर ते अक्कलकोट पायी प्रवास सुरु केला आहे. अक्षय नाईकवाडी म्हणाले आम्ही स्वामी समर्थांच्या चरणी साकडे घालणार आहाेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जरांगे पाटील यांना उपोषण करण्यापासून रोखावे. त्यांच्यावर उपोषणाची वेळ येऊ देवु नये अशी सरकारला सद्बुद्धी द्यावी. आरक्षणाचा लढा कायमस्वरूपी मार्गी लावावा यासाठी हे साकडे घालणार असल्याचे युवकांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मुंबईत पावसाचा कहर! सीएसएमटी ते मानखुर्द हार्बर लोकल सेवा बंद; नागरिकांचे हाल

वजन वाढवायचंय? असं एका महिन्यात वाढवा तुमचं Weight

Mumbai Rain: ठाण्यात पावसाचा रेल्वे सेवेला फटका, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्या

Teacher's Recruitment Special Report: ऑगस्टमध्ये 10 हजार शिक्षकांची भरती

Schools Closed Tomorrow: मुंबई, ठाण्यासह या जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

SCROLL FOR NEXT