Petrol-Diesel Crisis Saam Tv
महाराष्ट्र

Petrol-Diesel Crisis: पेट्रोल मिळत नसल्याने तरुणाची सटकली, थेट दुचाकीच पेटवून दिली; VIDEO व्हायरल

Man Burns His Own Bike in Public: संभाजीनगरमध्ये एका तरुणाने भररस्त्यात दुचाकी पेटवून दिली. पेट्रोल मिळत नसल्यामुळे तरुणाला राग अनावर झाला आणि त्याने हे कृत्य केले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • पेट्रोल टंचाईच्या रागातून तरुणाचा संताप

  • भररस्त्यात दुचाकी पेटवून दिली

  • पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेतलं

  • घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

माधव सावरगावे, संभाजीनगर

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल- डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल-डिझेल मिळत नसल्याच्या रागातून एका तरुणाने धक्कादायक कृत्य केले. त्याने भररस्त्यात आपली दुचाकी पेटवून दिली. संभाजीनगरमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. पेट्रोल-डिझेल मिळत नसल्यामुळे पेट्रोल पंपावर अनेक तास रांगेत उभं राहून देखील पेट्रोल मिळत नाही त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

'पेट्रोल मिळत नसेल तर गाडी हवीच कशाला?' असे म्हणत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका तरुणाने भररस्त्यात स्वतःचीच दुचाकी पेटवून दिली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. ही घटना सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील म्हसला फाटा येथे घडली. शरद गणपत भोजने असे दुचाकी पेटवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण सावखेडा येथे राहतो. पेट्रोल मिळत नसल्याच्या रागातून त्याने हे भयंकर कृत्य केले.

पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांमुळे सध्या राज्यभरात पंपांवर वाहनधारकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. याच अफवेतून सिल्लोड येथे शरद भोजने या तरुणाने शुक्रवारी दुचाकी पेटवून दिली. मात्र, त्याने हे कृत्य नशेत आणि स्टंटसाठी केल्याचेही बोलले जात आहे. सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील म्हसला फाटा येथे दुचाकी पेटवल्याने काही काळ वाहतून कोंडी आणि एकच गोंधळ निर्माण झाला होता. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच सिल्लोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचे टँकर मागवून दुचाकीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. दुचाकीसह तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी शक्रवारी रात्री पोलिस कर्मचारी विनोद सरोदे यांच्या तक्रारीवरून सिल्लोड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शरदने दुचाकी जाळल्याचा पश्चात व्यक्त करत नशेत हा प्रकार केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. त्यानंतर रात्रीच पोलिसांनी या तरूणाला समज देऊन सोडून दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला ११ वाजता कोर्टात हजर करणार

मुंबई लोकलमध्ये चाललंय काय? दगडफेकीनंतर दिव्यांगाला टोळीकडून मारहाण, ट्रेनमधून फेकून देण्याचाही प्रयत्न

Nagpur: नागपूर हादरले! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करत आयुष्य संपवलं

Anurag Dobhal : अनुराग डोभाल बनला बाबा; काही दिवसांपूर्वी केला होता आत्महत्येचा प्रयत्न, बाळाला हातात घेताच झाला भावुक | VIDEO

Petrol Rules: घरात किती पेट्रोल साठवावे? नियम आताच घ्या जाणून, नाहीतर...

SCROLL FOR NEXT