chhatrapati sambhaji nagar saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar News : पैठण- पाचोड राज्य मार्गावरील कार अपघातात युवक ठार, सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य गंभीर जखमी

पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- नवीनत तापडिया / शुभम देशमुख

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण- पाचोड राज्य मार्गावरील आखतवाडा फाटा येथे कार (Car) पुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर चौघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघाताची चाैकशी पाेलिस (police) करीत आहेत. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार या अपघातात राहुल बापूराव केसभट यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात नानेगाव येथील सरपंच अनिल बोधने (sarpanch anil bodhne), ग्रामपंचायत सदस्य कैलास शंकर जाधव, श्रीराम कल्याण बोधणे, बद्री नाहणू जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत.

सर्व जखमींना पैठण येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले हाेते. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

कोरंभीटोला येथे मायलेकाचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील कोरंभीटोला येथे घडलेल्या अपघातात मायलेकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. मृतक मोहन बांगरे हा आपल्या आईसह नातेवाईकांकडे जात असतांना कोरंभीटोला येथे भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली. यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मोहन बांगरे (२४) आणि पुष्पकला बांगरे (५५) अशी अपघातातील मृतकांची नावे आहे. ते दोघेही भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. घटनेची नोंद मोरगाव अर्जुनी पोलिसांनी घेतली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: लहानपणी गाई चरायला घेऊन जायच्या, लग्नासाठी कुटुंबाकडून दबाव, तरीही मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IAS सी वनमथी यांचा प्रवास

Pitru Paksha 2025 : पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू, या 4 राशींनी वेळीच जाणून घ्या उपाय; अन्यथा...

Maharashtra Live News Update : मुंब्रात इमारतीचा सज्जा कोसलळा, एका महिलेचा मृत्यू

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT