Latur News : 'मायबाप सरकार आमचा प्रश्न साेडवेल' निरागस मुलांना का करावं लागलं झेडपीच्या गेटवर आंदाेलन ?

आता तरी मार्ग निघेल अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे.
Latur, school students
Latur, school studentssaam tv
Published On

- संदिप भोसले

Latur News : आम्हांला शिक्षक द्या या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी आज (बुधवार) ठिय्या आंदोलन छेडले. अनेक विषयांना शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांनी स्वत:हून आंदाेलनाचा मार्ग स्विकारल्याचे पालकांनी सांगितले. (Maharashtra News)

Latur, school students
How can snails be controlled ? शेतकरी मित्रांनो ! गोगलगायपासून सावधान, वाचा कृषी विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण सल्ला

लातूर येथील अहमदपूर तालुक्यातल्या अंधोरी येथील जिल्हा परिषद शाळेत पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी लातूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारा समोर आज ठिय्या आंदोलन केले. या आंदाेलनाची जिल्हा परिषदेत देखील माेठी चर्चा हाेती.

Latur, school students
Shirdi News: भाविकांचे दातृत्व, शिर्डीतील दानपेटीत तीन काेटींची वाढ; 2 लाख भाविकांनी घेतला साईंचा आशीर्वाद

एकीकडे राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी संख्या नसल्याने शिक्षकांची पदे कमी केली जात आहे. मात्र लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या अंधोरी गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते दहावीपर्यंत एकूण विद्यार्थी संख्या 212 इतकी आहे.

मात्र 212 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी फक्त पाच शिक्षकाचीच पदे शाळेत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक विषयासाठी शिक्षकच नसल्याने मोठी कोंडी झाली आहे. शालेय समितीने व शिक्षकांनी वेळोवेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही शिक्षक भरतीची पूर्तता होत नसल्याने आज विद्यार्थ्यांनी (students) आंदोलनाचा (aandolan) मार्ग स्विकारला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com