yuvraj yadav saam tv
महाराष्ट्र

Shanti Mahotsav Buldhana 2023 : शांती महोत्सव विसर्जन मिरवणुकीत युवकाचा मृत्यू

या घटनेनंतर खामगाव येथील सतीफैल भागात शोककळा पसरली.

संजय जाधव

Buldhana News : बुलढाणा शहरात सुरू असलेल्या शांती महोत्सव विसर्जन मिरवणुकीत अस्वस्थ वाटू लागल्याने एका २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना रात्रीच्या सुमारास खामगाव येथे घडली. (Maharashtra News)

जगदंबा देवी शांती महोत्सवाच्या सांगते निमित्त शहराच्या विविध देवी मंडळाकडून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवराज उर्फ सुरेश यादव या युवकाला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तो मिरवणुकीतून बाहेर पडून एका शाळेत थांबला.

तेथेच तो बेशुद्ध पडला. ही घटना त्याच्या सहका-यांच्या निदर्शनास आल्यानंतर काही मित्रांच्या मदतीने त्याला शहरातील खासगी दवाखान्यात, त्यानंतर जलंब रोडवरील एका मोठ्या रूग्णालयात हलविले.

तेथे तपासणीअंती डॉक्टरांनी या युवकाला भरती करून घेण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शविली. त्यानंतर युवकाला मृतावस्थेत खामगाव येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी युवकाला मृत घोषित केले. तेथे मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. तथापि, डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा धक्का पोहोचल्याने या युवकाचा मृत्यू झाल्याची चर्चा सामान्य रूग्णालय परिसरात होती. मृतक युवकाच्या पश्चात आई, दोन भाऊ आणि एक बहिण असा आप्त परिवार आहे.

या घटनेमुळे सतीफैल भागात शोककळा पसरली आहे. युवकाच्या (youth) मृत्यूनंतर या भागातील विसर्जन मिरवणूक थांबविण्यात आली होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT