buldhana news, mrtc bus, police, bus driver, youth  saam tv
महाराष्ट्र

Msrtc Bus : बसचा फाटलेला पत्रा लागल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्या युवकांचा हात तुटला

दाेन्ही युवकांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

संजय जाधव

Buldhana News : धावत्या एसटी बसच्या (msrtc bus) फाटलेल्या पत्र्यामुळे रस्त्याच्या कडेला मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन तरूणांचे (youth) हात कापले गेले. या दाेन्ही युवकांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर - पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी काही तरुण रस्त्याच्या कडेला पोलीस भरतीसाठी व्यायाम करीत असतात. याच मार्गावरून मलकापूर आगाराची बस निघाली हाेती. या बसच्या चालकाच्या मागील बाजूचा पत्रा तुटून बाहेर आलेला होता. त्यामुळे व्यायाम करणाऱ्या तरुणांना या पत्र्याचा धक्का लागून दोन तरुणांचे हात कापले गेले.

हा अपघात इतका भीषण आहे की दोन्ही तरुणांचे हात अक्षरशः तुटून पडले. विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील असं या दोन्ही तरुणांच नाव असून त्यांच्यावर मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलविल्याची माहिती मिळत आहे. सध्या बस चालकाने बस धामणगाव बढे पोलीस स्थानकात उभी केली आहे. बस चालक पोलीस स्थानकातच आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT