aakash sutar , pune, pawas
aakash sutar , pune, pawas saam tv
महाराष्ट्र

Pawas : पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील मित्रांवर काेसळलं संकंट; गावखडी सुमद्रात एक बुडाला

साम न्यूज नेटवर्क

- जितेश काेळी

Pawas : पुण्याहून (pune) पावस (pawas) परिसरात फिरण्यासाठी आलेल्या चार मित्रांपैकी एकजण रविवारी गावखडी समुद्रात बुडाला. आकाश पांडुरंग सुतार (२८) असे बुडालेल्या तरुणाचे (youth) नाव असल्याचे पोलिसांनी (police) सांगितले. त्याचा शाेध आजही (साेमवार) सुरु असल्याचे पाेलीसांनी नमूद केले. (Maharashtra News)

पुण्याहून आकाश सुतार, प्रशांत जालिंदर काळे, राजकुमार शेषराव पिटले, ज्ञानोबा येडीलवाड हे चौघे मित्र सुट्टी असल्याने फिरण्यासाठी रत्नागिरीत पावसला आले होते. रविवारी सकाळी पावस पासून जवळच असलेल्या गावखडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. (Tajya Batmya)

समुद्रकिनाऱ्यावर फिरताना आकाश सुतार समुद्रात पोहण्यासाठी गेला. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेले तिघेजण पोहता येत नसल्याने समुद्रकिनारी बसून राहिले होते. पाण्याचा जोर वाढल्याने आकाश गटांगळ्या खाऊन बुडत असल्याचे मित्रांच्या लक्षात आले.

यावेळी राजकुमार पिटले याने समुद्राच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु आकाश दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने जवळच असलेल्या एका दुकानदाराला माहिती देऊन पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क केला. त्यानंतर तातडीने पोलीस व ग्रामस्थ यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र रात्री उशिरापर्यंत आकाशचा शोध लागला नव्हता. आज सकाळपासून पुन्हा आकाश याचा शाेध घेण्यास प्रारंभ झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Health: घामोळ्या, पुरळसारख्या समस्यांवर रामबाण उपाय; त्वाचेच्या सर्व समस्या होतील गायब

Kshitij Zarapkar : अभिनेते क्षितीज झारापकर यांचं कर्करोगाने निधन; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

ICC Champions Trophy: 'टीम इंडियाला पाकिस्तानात यावंच लागेल, अन्यथा...' माजी पाकिस्तानी खेळाडूची वॉर्निंग

Kalyan Crime News: तहान लागल्याने पाणी प्यायला गेली, नराधमानं संधी साधली; कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

India's Smallest Village: भारतातील सर्वात लहान गाव तुम्हाला माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT