Navratri : मनसेची ५० खाेके बक्षीस याेजना; रास दांडियात जिंकल्यास सुरत, गुवाहाटी, गोवा टूर

मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी जाहीर केलेली बक्षीस याेजना म्हणजे राज्यातील शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटलं जात आहे.
navratri 2022 , mns , ratnagiri , khed
navratri 2022 , mns , ratnagiri , khed saam tv
Published On

- जितेश कोळी

Navratri Festival 2022 : गणेशाेत्सवानंतर नवरात्राेत्सवाचे (navratri festival) वेध राज्यातील जनतेस विशेषत: युवा वर्गास लागले आहेत. नवरात्र काळात नवत्राेत्सव मंडळं, सामाजिक संस्था, युवा मंडळ आदी रास दांडिया स्पर्धेचे आयाेजन करतात. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे देखील नवरात्राेत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. या उत्सवा निमित्त मनसेनं (mns) दांडिया स्पर्धेचे आयाेजन केले आहे. त्यातील विजेत्यांना भरघाेस बक्षीस देण्यात येणार आहेत या बक्षीस याेजनेस मनसेनं पन्नास खाेके बक्षीस याेजना असे नाव दिलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवरात्रोत्सवातील दांडिया स्पर्धेचे आयाेजन केले आहे. त्याबाबतची माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिली. खेडेकर म्हणाले प्रतिवर्षा प्रमाणे यंदा छत्रपती शिवाजी चाैकात अंबामातेची प्रतिष्ठपना करण्यात येणार आहे. यावेळी विविध धार्मिक, सांस्कृतिक तसेच क्रीडा विषयक आणि दांडिया स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे.

रास दांडिया स्पर्धेतील विजेत्यांसाठी गुवाहाटी, सुरत आणि गोवा टूर पॅकेज असे बक्षीस ठेवण्यात आलं आहे. याबराेबरच इतर 50 बक्षीसं देखील आहे. त्यास 50 खाेके बक्षीस याेजना असं नाव देण्यात आले आहे असे खेडेकर यांनी नमूद केले.

दरम्यान मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी जाहीर केलेली बक्षीस याेजना म्हणजे राज्यातील शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटलं जात आहे. दरम्यान राज्यातील सत्तांतराच्या नाट्यापूर्वी शिवसेनेतील शिंदे गटाने सुरत, गुवाहाटी आणि गोवा असा जो प्रवास केला त्याचा अनुभव सामान्य जनतेला देखील यावा यासाठीच अशा स्वरूपाची बक्षिसे ठेवली असल्याची माहिती मनसेच्या खेडेकर यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

navratri 2022 , mns , ratnagiri , khed
Swapnali Sawant Case : पतीच्या अटकेनंतर स्वप्नाली सावंत खून प्रकरणात आता पाेलिसांसमाेर 'हे' आव्हान
navratri 2022 , mns , ratnagiri , khed
Malkapur Bus Depot : मलकापूर बस स्थानकात राडा; आगारप्रमुखांवर जमावाचा हल्ल्याचा प्रयत्न

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com