- जितेश कोळी
Swapnali Sawant Case : रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत (Swapnali Sawant) यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपींनी खून केल्यानंतर मृतदेह जाळून हाडे आणि राख समुद्रात फेकून दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ही बाब उघड झाली असली तरी स्वप्नाली यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधून पुरावे जमवण्याचे आव्हान आता रत्नागिरी पोलिसांसमोर (police) निर्माण झाले आहे.
पोलिसांनी या खून प्रकरणात स्वप्नाली सावंत यांचे पती सुकांत उर्फ भाई सावंत यांच्यासह अन्य दोन साथीदारांना दोन दिवसांपूर्वीच अटक केली आहे. रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत या एक सप्टेंबरला बेपत्ता झाल्या हाेत्या. त्यांच्या खुनातील मुख्य संशयित आरोपी असलेला त्यांचा पती सुकांत सावंत यानेच त्यांच्या बेपत्ता होण्याची खबर पोलिसांना दिली होती. मात्र या पती-पत्नीचा यापूर्वीचा पोलीस रेकॉर्ड पाहता दोघांमधील वाद ज्या पद्धतीने विकोपाला गेले होते ते पाहता पोलिसांनी पतीवरच तिला गायब करण्याचा संशय घेतला.
रत्नागिरी पोलिसांनी सुकांत सावंत यालाच मुख्य संशयित करून तपास सुरु केला. यां सर्वाला 8 दिवस उलटून गेले. स्वप्नाली सावंत गायब आहे. हे सत्य असतानाही तिचा कोणताही ठाव ठिकाणा सापडत नसल्याने पोलिसांसमोर तपास नेमका कोणत्या दिशेने करायचा हा प्रश्न होता.
त्यात इतर तपासात ज्या प्रमाणे मोबाईल लोकेशनचा उपयोग होतो तसा या केसमध्ये होत नसल्याने पोलीस समोर दिशा दिसतं असून त्या दिशेने पावले उचलू शकत नव्हते. मात्र पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे 10 दिवसांनी स्वप्नालीच्या आईनेच सुकांत सावंत यांच्या विरुद्ध तक्रार दिली. यामध्ये आपल्या मुलीला गळा दाबून मारून टाकून मृतदेह जाळून टाकल्याचा आरोप सुकांत सावंतसह दोघांवर केला.
त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी रविवारी तिघांना अटक केली. मात्र या फिर्यादीनुसार स्वप्नाली यांचा ज्या पद्धतीने खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे त्यानुसार पुरावे उभे करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गणेशोत्सवासाठी मिऱ्या येथील आपल्या मूळ घरात आलेल्या स्वप्नाली सावंत यांची पती सुकांत सावंत यानेच हत्या केल्याचे पोलीसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यानंतर सुकांत सावंतसह त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या चुलत भावासह कामागाराला पोलीसांनी अटक केली आहे.
सुकांत सावंत याने १ सप्टेंबरला दुपारी स्वप्नाली सावंत यांची हत्या केली. दिवसभर मृतदेह घरातील मागच्या बाजूला ठेवण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी त्याने चुलत भाऊ छोटा भाई व कामगाराला बोलावले. त्यानंतर तिघांनी रात्री घराच्या आवाराताच मृतदेह जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर तेथील राख, हाडे समुद्रात फेकून देण्यात आल्याचेही पोलीसांच्या तपासात समोर आले आहे. स्वप्नाली सावंत यांची हत्या झाल्याने त्यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्याचे मोठे आव्हान शहर पोलीसांसमोर आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.