Nashik News Saam TV
महाराष्ट्र

Nashik News: धावती ट्रेन पकडणं बेतलं जीवावर; RPF जवानाच्या सतर्कतेने तरुण थोडक्यात बचावला

खाली पडत असलेल्या व्यक्तीला खेचून आरपीएफ जवान त्याचा जीव वाचवतो.

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

Nashik News: रेल्वे प्रवासाच्या अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशा अपघातात अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. नाशिक रोड रेल्वे स्टेशनमधला असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये RPF जवानाने दाखवलेल्या सतर्कतेने एका प्रवाशाचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. (Latest Nashik News)

नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथून सुरू झालेल्या पवन एक्सप्रेसमध्ये चढताना एका प्रवाशाचा तोल जातो आणि तो ट्रेनखाली पडणार असतो. तितक्यात रेल्वे स्थानक परिसरात कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचाराच्या हे लक्षात येते. त्यामुळे खाली पडत असलेल्या व्यक्तीला खेचून आरपीएफ जवान त्याचा जीव वाचवतो.

KK यादव असे जीव वाचवणाऱ्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पवन एक्सप्रेस उभी होती यावेळी १८ वर्षीय राम मोहरी प्रजापती हा तरुण प्लॅटफॉर्मवरून पवन एक्सप्रेसमध्ये चढत रेल्वे गाडीत सामान टाकत असताना ट्रेन सुरू झाली.

यावेळी रेल्वेत चढण्याच्या घाईमध्ये त्याचा तोल गेला आणि तो रेल्वे खाली येण्याआधी येथे तैनात कर्मचारी के के यादव यांनी ही घटना पाहताच त्याला गाडीपासून दूर ओढत त्याचा जीव वाचवला.या घटनेत काही फूट अंतर हा प्रवासी फरफटत गेला होता.

मात्र रेल्वे पोलीस यादव यांच्या तत्परतेने या १८ वर्षीय प्रवाशाचा जीव वाचला आहे.स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी धावलेल्या रेल्वे पोलीस कर्मचारी यादव यांचे सर्वच स्थरातून कौतुक केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Marathi Actress Prajakta : 'Gen Z च्या नावाखाली हि**, समलिंगी...'; अभिनेत्री प्राजक्तावर आक्षेपार्ह कमेंट, नेटकरी संतापले

Diwali Faral : ना तूप, ना तेल! तरीही चवीला स्वादिष्ट; दिवाळी फराळ बनवण्याची खास ट्रिक लगेच वाचा

Accident : बायपासवर भीषण अपघात! ३ वाहनांची जोरदार धडक, ४ जणांचा होरपळून मृत्यू

१६ महिन्यांत ३६ जणांना मृत्युदंड, 'त्या' न्यायाधीशांची तडकाफडकी कौटुंबिक न्यायालयात बदली

SCROLL FOR NEXT