Crime News Saam Tv News
महाराष्ट्र

Crime News: आईस्क्रिम आणायला गेली, तरूणानं जबरदस्ती पकडलं, लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; परिसरात खळबळ

Washim Crime News: आईस्क्रिम आणण्यासाठी गेलेल्या एका ७ वर्षीय चिमुकलीवर एका १९ वर्षीय तरूणानं लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय. नराधम आरोपी ताब्यात.

Bhagyashree Kamble

पुण्यातील स्वारगेट परिसरातील तरूणीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आणखी एका घटनेमुळे नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे. आईस्क्रिम आणण्यासाठी गेलेल्या एका ७ वर्षीय चिमुकलीवर एका १९ वर्षीय तरूणानं लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय. ही धक्कादायक घटना वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. एका ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न एका १९ वर्षीय नराधम तरूणानं केला आहे. पीडित मुलीच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तसेच १ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वाशिम शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली दुकानात आईस्क्रिम आणण्यासाठी गेली होती. मात्र, बराच वेळ होऊनही मुलगी घरी काही परतली नाही. बराच वेळ ती घरी परत न आल्यानं तिच्या आईनं वडिलांना चौकशी करण्यास सांगितलं. वडिलांनी दुकानात चौकशी केली. दुकानदारानं मुलगी इथं आली नसल्याचं सांगितलं.

यामुळे पालकांना मुलगी गेली कुठं? ही चिंता सतावत होती. संशय आल्यामुळे पीडित मुलीच्या वडिलांनी दुकानात वाकून पाहिले. तेव्हा मुलगी त्याठिकाणी असल्याचं निर्दशनास आलं. तेव्हा वडिलांना आरोपी मुलीसोबत संशयास्पद अवस्थेत आढळला होता. त्यामुळं पीडितेच्या वडिलांनी आईला बोलावून संबंधित प्रकार दाखवला.

पीडित मुलीच्या वडिलांनी तातडीने ११२ वर कॉल करून घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांचे मदत पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत शहर पोलिसांकडे सुपूर्द केले. या घटनेनंतर परिसरातील नागरीकांनी संताप व्यक्त केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT