Aurangabad News Saam Tv
महाराष्ट्र

गुटखा खाणं जीवावर बेतलं; ठसका लागल्याने तरुणाचा मृत्यू!

ही घटना शहरातील उस्मानपुरा भागात घडली आहे. गणेश दास असे मृत तरुणाचे नाव आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - एका तरुणाला गुटखा खाणे चांगलेच महागात पडले आहे. काम करताना ठसका लागला आणि तो जागेवर बेशुद्ध झाला. त्यानंतर या तरुणाला रुग्णालयात (Hospital) नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. ही घटना शहरातील उस्मानपुरा भागात घडली आहे. गणेश दास असे मृत तरुणाचे नाव आहे.

हे देखील पहा -

गणेश एका खाजगी कंपनीत कामाला होता. कंपनी मालकाच्या घरी गणेश डिश टीव्ही बसवण्यासाठी गेला होता. गणेशला गुटखा खाण्याची सवय असल्याने डिश टीव्ही बसवत असताना त्याने नेहमी प्रमाणे आपल्या खिश्यातुन गुटख्याची एक पुडी फोडून ती खाल्ली आणि याचवेळी त्याला अचानक ठसका लागला आणि ते बेशुद्ध झाला. त्यानंतर या तरुणाला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.

शवविच्छेदनाच्या अहवाला नुसार, गणेशच्या अन्ननलिकेत सुपारीअडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच समोर आलं आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी देखील गुटख्याच्या विळख्यात अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Edited By- Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT