उरलेल्या मिठाईचा वापर करून गोड पदार्थांना द्या नवा ट्विस्ट
मिठाई फेकून देण्याऐवजी सोप्या रेसिपीज बनवा
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील
दिवाळी म्हटली की घरात मिठाई, फराळ आणि गोड पदार्थांची रेलचेल असते. दिवाळीत अनेकदा घरात पेढे, बर्फी, गुलाबजामुन किंवा लाडू उरतात. ही मिठाई पुन्हा पुन्हा खाण्याऐवजी त्यापासून काहीतरी नवीन आणि हटके पदार्थ बनवता येतात. उरलेल्या मिठाईचा वापर करून स्वादिष्ट डेझर्ट तयार करता येतात. दिवाळीत उरलेल्या मिठाईपासून बनवता येणाऱ्या २ सोप्या आणि चविष्ट रेसिपी आताच लिहून घ्या.
साहित्य
उरलेले पेढे
दूध
मिल्क पावडर
क्रीम
चिमूटभर वेलची पूड
बदाम आणि पिस्त्याचे काप
कृती
एका पातेल्यात दूध घ्या आणि मंद आचेवर गरम करून थोडे आटवा. पेढे हाताने कुस्करून घ्या आणि गरम दुधात मिसळा. त्यात मिल्क पावडर आणि क्रीम घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. वेलची पूड आणि बदाम-पिस्त्याचे काप घाला. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर कुल्फीच्या साच्यांमध्ये भरा. साचे फ्रीजरमध्ये ६ ते ८ तास किंवा कुल्फी पूर्ण सेट होईपर्यंत ठेवा. कुल्फी साच्यातून बाहेर काढून वरून ड्रायफ्रूट्स घालून सर्व्ह करा.पेढे गोड असल्यामुळे अतिरिक्त साखर घालण्याची गरज नसते.
साहित्य
गुलाबजामुन
दूध
साखर
बदाम
पिस्ते
चिमूटभर वेलची पूड
केशर
सर्वप्रथम एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध घ्या आणि मंद आचेवर गरम करा. दूध उकळल्यानंतर सतत ढवळत ते थोडे घट्ट होऊ द्या. दूध आटून त्याची रबडीसारखी घट्टसर पोत तयार होईल. त्यात वेलची पूड, केशर आणि आवश्यकतेनुसार साखर घाला. गुलाबजामुन आधीच गोड असल्यामुळे साखर कमी घालावी. गुलाबजामुनचे छोटे तुकडे करा आणि तयार रबडीमध्ये घाला. वरून बदाम-पिस्त्याचे काप घालून मिश्रण थंड होऊ द्या. फ्रिजमध्ये थंड करून सर्व्ह करा. गुलाबजामुन पाकात भिजलेले असल्यामुळे रबडीमध्ये अतिरिक्त साखर घालण्यापूर्वी चव तपासा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.