Punjab: 'या' तारखेला भगवंत मान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; राज्यपालांची घेतली भेट

शुक्रवारी मोहालीमध्ये झालेल्या आप आमदारांच्या बैठकीत भगवंत मान यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
Punjab Elections Update भगवंत मान पंजाबचे नवे मुख्यमंत्री
Punjab Elections Update भगवंत मान पंजाबचे नवे मुख्यमंत्री- Saam Tv

चंदीगड - पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी शनिवारी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. भगवंत मान 16 मार्च रोजी दुपारी12.30 वाजता ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शुक्रवारी मोहालीमध्ये झालेल्या आप आमदारांच्या बैठकीत भगवंत मान यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

सरकारमध्ये मंत्रीपदासाठी हरपाल सिंग चीमा, अमन अरोड़ा, बलजिंदर कौर, सर्वजीत कौर मनुके, गुरमीत सिंग, मीत हेअर, बुद्ध राम, कुंवर विजय प्रताप सिंग, जीवनज्योत कौर आणि डॉ चरणजीत सिंग यांच्यासह अनेक आप आमदारांची नावे पंजाबमध्ये चर्चेत आहे.

Punjab Elections Update भगवंत मान पंजाबचे नवे मुख्यमंत्री
Vijay Wadettiwar: ...तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारला धोका नाही: विजय वड्डेटीवार

भगवंत मान यांनी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे. नवांशहर जिल्ह्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलान येथे भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.117 सदस्यीय विधानसभेत आम आदमी पक्षाने 92 जागा जिंकल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com