निवडणुकीत जय परायज होत असतो, सत्तेत सहभागी होण्याची प्रत्येक पक्षाची इच्छा असते. महाविकास आघाडी सरकार जोपर्यंत लोकांच्या मनात आहे तोपर्यंत हे सरकार आहे. महाविकास आघाडी (Mahavikas aghadi) सरकारमधील जोपर्यंत एक पक्ष फुटत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीला धोका नाही, असं वक्तव्य मंत्री विजय वड्डेटीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले आहे. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
१९९४ पर्यंत वॅार्ड रचना, प्रभाग रचना ही कामं राज्य सरकारकडे होती. पण ती निवडणूक आयोगाकडे गेली होती. आता तो अधिकार राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय झाला आहे. राज्य सरकार निर्णय घेऊन राज्य निवडणूक आयोगाला कळवणार आहे. सहा महिन्यात हे काम संपवून आम्ही निवडणूक आयोगाला कळवणार आहे. आम्ही काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटलो. त्यांना या विधोयकायवर सही केली.
जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुका सहा महिन्यांपर्यंत पुढे जातील. उर्जा खात्याला या अर्थसंकल्पात कमी निधी मिळाला असला तरी पुरवण्या मागण्यात निधी मिळेल. ओबीसी विभागाला राज्य सरकारचा निधी असतो. केंद्र सरकार ओबीसींना (OBC) निधी देत नाही, असही मंत्री वड्डेटीवार (Vijay Vaddetiwar) म्हणाले.
कुणबी समाजाचा सारथी मध्ये समावेश आहे. लोकसंख्येनुसार निधीची आमची मागणी होती. महाज्योतीला २५० कोटी मिळाले निधी मिळाला आहे. महाज्योती, बारटी आणि सारथीला सारखा निधी मिळाला आहे, असही ते म्हणाले.
भटक्या जमातीबाबत माहिती घेण्यासाठी काम करणार आहे. १५ हजार विद्यार्थ्यांना स्कील डेव्हलपमेंट प्रशिक्षण देणार असून पीएचडी च्या सर्व विद्यार्थांना नोंदणी आणि अवॅार्ड झाल्यापासून ३१ हजार रुपये देणार असल्याचेही वड्डेटीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितले.
Edited by - Santosh Kanmuse
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.