Nagpur Saam
महाराष्ट्र

Nagpur Crime: दारूचा ग्लास हातून निसटला अन् फुटला, अड्ड्यावरील कामगारांकडून बेदम मारहाण; एकाचा जागीच मृत्यू

Young Man Loses Life Over Liquor Shop Incident: दारू पिण्यासाठी गेलेल्या तरूणाच्या हातातून दारूचा ग्लास खाली पडून फुटल्याच्या कारणावरून अड्ड्यावरील कामगारांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला.

Bhagyashree Kamble

Crime News: दारू पिण्यासाठी गेलेल्या तरूणाच्या हातातून दारूचा ग्लास खाली पडून फुटल्याच्या कारणावरून गुत्त्यावरील कामगारांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना नागपुरातील खडगाव मार्गावरील सायरे देशी दारूगुत्त्यावर घडली असून, या घटनेनंतर पोलिसांनी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच चौकशी करून पाच आरोपींना अटक केली.

सूरज भलावी (वय २७) असे मृत तरूणाचे नाव आहे. खडगाव मार्गावरील सायरे देशी दारूच्या अड्ड्यावर दारू प्यायला गेला होता. यादरम्यान, दारू प्यायल्यानंतर त्याच्या हातातून दारूचा ग्लास खाली पडला. दारूचा ग्लास काचेचा असल्याकारणामुळे फुटला. याच कारणावरून गुत्त्यावरील कामगारांनी त्याला बेदम मारहाण केली. सुरुवातीला त्याला शिवीगाळ करण्यात आली आणि नंतर जोरदार मारहाण केली.

मारहाणीनंतर सूरज गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला दारूगुत्त्याबाहेर फेकून दिले गेले. सूरजला मारहाण झाल्याची माहिती त्याचा भाऊ सौरभला मिळाल्यानंतर त्याने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी सूरजला मेवो हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र उपचारादरम्यान बुधवारी त्याचा मृत्यू झाला.

सूरजचा भाऊ सौरभने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच चौकशी करून पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक सुरु

सातारा ZP अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सीसीटीव्ही बंद असल्याचे पत्र समोर|VIDEO

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

Viral Video: बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्या नाहीतर...! प्रेमासाठी तरूणी चढली टॉवरवर, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT