Auto Driver: ऑटोमधून उतरला अन् प्रायव्हेट पार्ट दाखवला, अंधारात ड्रायव्हरचं महिलेसोबत घृणास्पद कृत्य

Shocking Incident in Bhopal: भोपाळमध्ये ओला ऑटो बुक करणं महिलेला महागात; निर्जनस्थळी नेऊन चालकाकडून अश्लील कृत्य, पोलिसांनी आरोपीला अटक
Auto Driver
Crime NewsSaam tv
Published On

Bhopal News: मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका महिलेला ऑनलाइन कॅब बुक करणं चांगलंच महागात पडलं आहे. एका महिलेनं ओला ऑटो बुक केली होती. नंतर त्याने ऑटो एका निर्जन ठिकाणी नेली. बाथरूममध्ये जायचे सांगून, तो ऑटोमधून उतरला आणि महिलेला आपले गुप्तांग दाखवून अश्लील कृत्य करण्यास सुरूवात केली. यानंतर महिला घाबरली आणि थेट पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी ऑटो चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

पीडित महिला मध्यप्रदेश भोपाळ येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. या महिलेनं बैरागडहून भोपाळ शहरात जाण्यासाठी ओला ऑटो बुक केली होती. त्यानंतर ऑटो चालक महिलेला एका निर्जनस्थळी घेऊन गेला. बाथरूम जाण्याच्या बहाण्याने खाली उतरला. निर्जनस्थळी जाऊन ऑटो चालकाने पीडित महिलेला आपले गुप्तांग दाखवले तसेच अश्लील चाळे केले.

Auto Driver
Weather: उकाड्याचा कहर, तापमान ४२.५ अंश सेल्सिअसवर, पुणेकरांना आणखी बसणार उन्हाचे चटके

पीडित महिला त्यानंतर घाबरली. तिने थेट पोलीस ठाणे गाठले. तिने तक्रारीत म्हटलं की, 'ऑटो चालकाने निर्जनस्थळी आपली ऑटो थांबवली. बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने खाली उतरला. नंतर गुप्तांग दाखवत अश्लील चाळे करण्यास सुरूवात केली. मला ऑटो चालकाचा हेतू बरोबर वाटला नाही. ऑटो ड्रायव्हरच्या कृतीने मी घाबरले. मी ऑटोमधून खाली उतरली आणि लिफ्ट घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना तसेच कुटुंबाला याची माहिती दिली'.

पोलिसांनी महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. तसेच आरोपीला अटक केली. या प्रकरणी आता आरोपीची चौकशी सुरू आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर ऑटो ड्रायव्हर विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

Auto Driver
Kalyan: कल्याणमध्ये ड्रग्जचा सुळसुळाट, इराणी लेडी डॉनकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त; परिसरात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com